८.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८४ वा जन्मोत्सव सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात साजरा करण्यात आला. त्या कालावधीत विविध प्रसंगांतून साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

१. स्वप्नात ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी बेलपत्राची एक फांदी दिली’, असे दिसणे
‘१९.४.२०२६ या रात्री स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांच्यासह श्री. विनायक शानभागही (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) होते. स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मला बेलपत्राची एक फांदी दिली आणि मी त्याच वेळी त्यांच्या श्रीचरणी साष्टांग नमस्कार केला. ही गोष्ट मी जेव्हा श्री. विनायकदादांना भ्रमणभाषवर अनौपचारिक बोलतांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले, ‘‘कदाचित् ही गोष्ट एखाद्या यज्ञाची पूर्वसूचना असू शकते.’’
२. कापराचे उपाय करतांना शिवतत्त्वाचे स्मरण होणे आणि शिवाच्या मंदिरात जाण्याची संधी मिळणे
मागील काही दिवसांपासून मला उष्णतेचा फार त्रास होत होता. तेव्हा ‘शरिराला शीतलतेची, थंडाव्याची आवश्यकता आहे’, असे वाटत होते. काही दिवसांपासून भीमसेनी कापराचे उपाय करतांना प.पू. गुरुदेवांनी सुचवले की, कापूर म्हणजे शिवतत्त्व आहे. कापराचे उपाय करतांना मी ‘शिवतत्त्व ग्रहण करत आहे’, असा भाव ठेवणे चालू केले. त्या वेळी कैलासचे स्वामी भगवान शिवाचे स्मरण होऊ लागले. एके दिवशी मी शिवपिंडीची मानसपूजाही केली. त्यानंतर २९.४.२०२६ या दिवशी मथुरा येथील अमरनाथ महाविद्यालयात एक संपर्क करण्यासाठी जाण्याचे आमचे नियोजन झाले. तेथे भगवान शिवाच्या मंदिरात दर्शन घेण्याची मला संधी मिळाली.
३. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाका शिवपिंडीची पूजा करत आहेत’, असे छायाचित्र मिळणे
या अनुभूतीच्या २ दिवसानंतर मला ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाका शिवपिंडीची पूजा करत आहेत’, असे छायाचित्र मिळाले. ते छायाचित्र पहाताच माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि प.पू. गुरुदेवांच्या श्रीचरणी कृतज्ञताही व्यक्त झाली की, प.पू. गुरुदेवांनीच आम्हाला त्यांच्याशी जोडून ठेवले आहे.
४. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या ‘आयुष होम’ या होमाची मुख्य देवता भगवान शिव असल्याचे कळणे आणि सोमनाथ शिवलिंगाचेही दर्शन होणे

या शृंखलेत ८.५.२०२६ या दिवशी प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव झाला. जन्मोत्सवाच्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात होणार्या ‘आयुष होम’चे थेट प्रक्षेपण पहाण्याची संधी मिळाली. या होमाची मुख्य देवता भगवान शिव होती आणि रामनाथी आश्रमात आलेल्या सोमनाथ शिवलिंगाचेही दर्शन झाले.
गुरुदेवांच्या कृपेने एकामागोमाग एक प्रसंग घडत गेले आणि श्री गुरूंची कृपा अनुभवू शकले, याबद्दल त्यांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. मनीषा माहुर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३१ वर्षे), मथुरा सेवाकेंद्र, उत्तर प्रदेश. (१७.५.२०२६)
धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली ही वाईट स्थिती !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
विदेशातील रज-तम वातावरणात राहूनही शेवटच्या क्षणापर्यंत साधना करणार्या मोझांबिक (आफ्रिका खंड) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सरलाबाय जसवंतलाल रघुवंशी (वय ८७ वर्षे) !
‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !
मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
शिष्यापेक्षा गुरूंची साधना पुढच्या टप्प्याची !