ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या संदर्भातील चौकशी अद्याप चालू ! – नवी देहली पोलीस

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह

नवी देहली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून देशातील कुस्तीपटूंचे जंतरमंतरवर आंदोलन चालू होते. २ दिवसांपूर्वीच पोलिसांनी या कुस्तीपटूंना कह्यात घेऊन त्यांचे तंबूही काढून टाकले. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याविषयी पोलिसांनी ‘सिंह यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही’, असे सांगितल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. यावर पोलिसांनी ‘अद्याप या प्रकरणची चौकशी चालू आहे’, असे स्पष्ट केले.