परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन केल्यावर मन स्थिर होणे

सौ. सानिका गावडे

‘जेव्हा जेव्हा माझ्या मनाचा संघर्ष होतो, तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलते. त्या वेळी संघर्षातील प्रसंगापेक्षा मला त्यांचीच आठवण अधिक येऊन त्यांच्याशी बोलणे होते. त्यामुळे त्याचा मला आनंद अधिक होतो. प्रसंग झाल्यानंतर किंवा होत असतांना मनातून परात्पर गुरुदेवांशी बोलल्याने संघर्षाचा कालावधीही न्यून होत जातो आणि मनाला हलकेपणा वाटून प्रसंगाविषयी काहीच वाटत नाही. त्या वेळी तो प्रसंग क्षुल्लक वाटून मन स्थिर होते. या स्थितीत मी कधीकधी परात्पर गुरुदेवांवर रागावतेसुद्धा. नंतर ‘त्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी पुष्कळ केले आहे, करत आहेत आणि करणार आहेत, तरीही ‘मी त्यांच्यावर रागावते’, या गोष्टीचे मला पुष्कळ वाईट वाटते. पुन्हा मी त्यांची क्षमायाचना करते आणि त्यांचे चरण घट्ट पकडून रडते. तेव्हा माझ्या मनाला हलकेपणा वाटून स्थिरता जाणवते.’

– सौ. सानिका गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक