परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवण्याची सेवा भावपूर्ण, शरणागतीने अन् नामजपासहित करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन !

‘सौ. पार्वती जनार्दन यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवायची सेवा मिळाली होती. बंडी शिवण्याच्या निमित्ताने त्यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा त्यांच्या झालेल्या सहज संवादातील भावार्थ जाणून त्यांचे देवत्व ओळखून त्यांनी कशी सेवा केली, हे आपण २५ मे या दिवशी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया. (भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/685762.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवण्याची सेवा करतांना झालेले त्रास !

सौ. पार्वती जनार्दन

४ अ. सेवा चालू केल्यावर मनाची स्थिती बिघडणे

४ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बंडीत सुधारणा करण्याआधी आणि नंतर साधिका अन् बंडी यांचे ‘यू.ए.एस्.’द्वारे निरीक्षण नोंद करायचे असणे, त्याच वेळी भ्रमणभाष बिघडल्यामुळे घराकडचे काळजीचे विचार मनात येऊन पुष्कळ ताण येणे : ४.६.२०२१ या दिवसापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘बंडीमध्ये सुधारणा करण्याच्या सेवेला संशोधनाची जोड द्या’, असे सांगितले. त्यासाठी मी आणि बंडी यांच्या शिवणकाम चालू करण्यापूर्वी अन् शिवणकाम झाल्यानंतर ‘यू.ए.एस्.’द्वारे (‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’द्वारे) निरीक्षणाच्या नोंदी करायच्या ठरल्या. या सेवेच्या वेळी पुष्कळ सूत्रे एकत्र वेळी आल्यामुळे एक दिवस मला पुष्कळ मानसिक त्रास होत होता. त्याच वेळी माझा भ्रमणभाष बिघडल्यामुळे माझ्या मनात ‘घराकडील काळजीचे विचार येत होते आणि सेवाही करायची होती. या विचारांच्या गुंत्यात अडकल्यामुळे माझ्या मनाची स्थिती नकारात्मक झाली होती आणि मला पुष्कळ ताण आला.

४ अ २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्री गुरूंचे कपडे शिवणे आणि त्यावर संशोधन करणे’, ही समष्टी सेवा आहे’, त्याचे समष्टी महत्त्व वाईट शक्तींना कळत असल्यामुळे त्या सेवेत त्रास देत आहेत’, असे सांगणे : मी अन्य एका सेवेसाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे गेले होते. त्यांच्याशी बोलतांना मी माझी स्थिती त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू श्री गुरूंची सेवा करत आहेस आणि बंडीचे संशोधन ही समष्टी सेवा आहे. त्यामुळे तुझ्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होत आहेत. तू स्वयंसूचनांची सत्रे कर आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय वाढवण्याचा प्रयत्न कर. देव सर्व करून घेईल.’’ थोडा वेळ त्यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनाच्या स्थितीत थोडा पालट झाला.

४ अ ३. सात्त्विक पद्धतीने कपडे शिवल्यावर त्यावर ग्रंथनिर्मिती होईल, त्यामुळे पुढील मानवजातीला सात्त्विक कपड्यांचे महत्त्व समजेल, त्याचा समाजाला लाभ होऊन ‘समाजाची सात्त्विकता वाढू नये’, यासाठी वाईट शक्ती त्यात अडथळे आणत आहेत’, असे लक्षात येणे : ‘कपडे सात्त्विक पद्धतीने शिवण्याविषयी संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिला, तर पुढील मानवजातीसाठी ती मोठी देणगी असणार आहे. मनुष्यासाठी कपडे ही प्राथमिक आवश्यक गोष्ट असल्याने प्रत्येक व्यक्तीने सात्त्विक कपडे परिधान केले, तर त्याचा सत्त्वगुण वाढेल. ती व्यक्ती सात्त्विक कृती आणि पुढे साधनाही करील. हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक आहे. ‘श्री गुरूंचे (ईश्वराचे) नियोजन काय आहे ?’, हे सामान्य जिवांना कळत नाही; पण ‘वाईट शक्तींना सूक्ष्मातून त्याचे व्यापकत्व आधीच कळत असल्याने त्या या सेवेत अडथळे आणत असाव्यात’, हे माझ्या लक्षात आले.

४ आ. परात्पर गुरुदेवांच्या बंडीत सुधारणा करण्याची सेवा चालू असतांना त्यावर आक्रमण होणे आणि साधिकेच्या बोटातील सांध्यावर काळे दिसणे : परात्पर गुरुदेवांच्या बंडीत सुधारणा करण्याची सेवा चालू केल्यावर त्यांच्या दोन्ही बंड्यांवर आक्रमण झाले. ‘यू.ए.एस्.’द्वारे नोंदी केल्यावर हे लक्षात आले. त्यांच्या बंड्यांवर आक्रमण झाले, त्याच दिवशी माझ्या दोन्ही हातांच्या बोटांतील सांध्यावर काळा भाग असल्याचे दिसत होते.

५. बंडीचे कापड कापतांना आणि शिवतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून अन् स्थूलातून करून घेतलेले प्रयत्न

त्यानंतर पुन्हा नवीन बंडी शिवायचे ठरले. ‘गुरुदेवांच्या बंडीसाठी कुठले कापड घ्यायचे ? कधी आणि कुणाच्या हस्ते ती शिवून घ्यायचे ?’, हे सर्व ईश्वर नियोजित असणार आहे. त्याप्रमाणेच सर्व काही होणार आहे. सूक्ष्मातून या सर्व कृती आधीच झाल्या आहेत. मी निमित्तमात्र असून मला स्थुलातून बंडी शिवण्याची सेवा करायची आहे’, असे विचार माझ्या मनात चालू होते. ‘गुरुदेवांनी बंडी घालून बघितल्यावर त्याला कुठेही सुरकुत्या न पडता त्यांना अपेक्षित अशी बंडी व्यवस्थित बसली आहे’, असे दृश्य मी मनात ठेवून भावाच्या स्तरावर प्रयत्न करत गुरुदेवांनी सूक्ष्मातून शिकवल्याप्रमाणे आकार रेखाटले आणि कापड कापून घेतले. कापड शिवायला घेतांना श्रीकृष्णाला शरण जाऊन महर्षींचे स्मरण करत बंडी शिवून पूर्ण केली.

६. परात्पर गुरु डॉक्टरांसाठी शिवलेली बंडी त्यांना बरोबर बसणे, त्यांना ती आवडणे आणि त्यांनी साधिकेला प्रसाद पाठवणे

२७.६.२०२१ या दिवशी सकाळी बंडी शिवून पूर्ण झाली. सकाळी गुरुदेवांनी ती घालून पाहिली. तेव्हा त्यांना ती बंडी बरोबर बसली. कुठेही सुरकुत्या दिसत नव्हत्या. गुरुदेवांना ती बंडी आवडली; म्हणून त्यांनी मला प्रसाद पाठवला.

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्याकडून भावाचे प्रयत्न करून घेऊन पहिल्या प्रयत्नातच बंडी व्यवस्थित शिवून घेतली. त्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोमल चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’

(समाप्त)

– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.