इम्रान खान यांच्या घरामध्ये ३० ते ४० आतंकवाद्यांनी घेतला आश्रय !

  • पोलिसांनी घेरले इम्रान खान यांचे घर !

  • २४ घंट्यांत आतंकवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्याची चेतावणी !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

लाहोर (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’(पी.टी.आय.) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या येथील घराला पोलिसांनी घेरले आहे. त्यांच्या घरामध्ये ३० ते ४० जिहादी आतंकवाद्यांनी आश्रय घेतला आहे, असा दावा केला जात आहे. पोलिसांनी इम्रान खान यांना आतंकवाद्यांना पोलिसांच्या हवाली करण्यासाठी २४ घंट्यांची समयमर्यादा दिली आहे.

पंजाब प्रांताचे माहिती आणि प्रसारण मंत्री आमिर मीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इम्रान खान यांच्या पक्षाने या आतंकवाद्यांना पोलिसांकडे सोपवले पाहिजे, अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. खान यांचा पी.टी.आय. पक्ष आता आतंकवाद्यांप्रमाणे वागत आहे. त्याच्याकडूनच इम्रान खान यांच्या अटकेपूर्वीच सैन्याच्या मुख्यालयावर आक्रमण करण्याचा कट रचण्यात आला होता.