श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील अनुभवलेले चैतन्य आणि प्रीती !

श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला चेन्नई येथे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या निवासस्थानी एका सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा अत्यंत अल्प वेळेतही मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्य आणि प्रीती अनुभवता आली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्री. विठ्ठल कदम

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ  यांच्यातील अनुभवलेले चैतन्य !

१ अ. चेन्नई सेवाकेंद्रातील एका खोलीच्या बाहेर जाणवणार्‍या चैतन्यामुळे ‘ती खोली श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची असावी’, असे वाटणे : ‘मी आणि सहसाधक चेन्नई येथील सेवाकेंद्रात पोचल्यावर मला एका खोलीच्या बाहेर चैतन्याची स्पंदने जाणवत होती. त्या खोलीच्या बाहेरच चैतन्य अनुभवल्यावर ‘कुणालाही इथे देवीचा वास आहे’, असे वाटले असते. ती खोली श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची होती.

१ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर झोप जाऊन पुष्कळ हलके वाटणे : प्रवासामुळे माझी झोप पूर्ण न झाल्याने मला झोप येत होती. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर माझी झोप जाऊन मला पुष्कळ हलके वाटले. आम्ही चेन्नई सेवाकेंद्रात पहाटे ४.३० वाजता पोचलो होतो; पण श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ त्या आधीच उठून आमची वाट पहात होत्या. जणू ‘आपल्या मुलांना कधी भेटू ?’, असे एखाद्या आईला वाटते, तसे वातावरण मला अनुभवता आले. आम्हालाही ‘कधी एकदा देवीचे दर्शन घेतो’, असे झाले होते.

१ इ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि ‘इथेच नामजप करत बसावे’, असे मला वाटले.

१ ई. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यासारखे जाणवून ‘तिथे अनेक देवींचा वास आहे’, असे जाणवणे : मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यावर आपल्याला देवाविना काही दिसत नाही, तसे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या खोलीत गेल्यावर मला अनुभवता आले. मला ‘त्यांच्या खोलीत देवी वेगवेगळ्या रूपात वास करत आहे’, असे जाणवले. तेव्हा ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ श्री महालक्ष्मीदेवी आहेत’, याची ही प्रचीती आहे’, असे मला वाटले.

आम्ही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत केवळ ४ घंटेच होतो; पण तेवढ्या वेळेतही त्यांनी आम्हाला भरभरून चैतन्य दिले.

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

२ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी स्वतःच सरबत करून ते साधकांना प्यायला देणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ, म्हणजे प्रीतीचा महासागरच आहेत. त्यांनी स्वतःच सरबत करून ते आम्हाला प्यायला दिले. सरबत पितांना मला साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीच्या हातचे अमृत प्यायला मिळाले असून मी ‘चैतन्याचा रस पीत आहे’, असे जाणवले. हा जीव धन्य झाला ! त्यांच्या प्रीतीमय बोलण्यामुळे ‘मला तिथून निघावे’, असे वाटतच नव्हते.

२ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधकांना प्रसाद देऊन कपाळावर टिळा लावणे : आम्ही दुसर्‍या एका सेवेसाठी जातांना त्यांचा निरोप घेत होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला प्रसाद दिला आणि आमच्या कपाळावर टिळा लावला. त्या आम्हाला टिळा लावतांना मला सूक्ष्मातून ‘यशस्वी भव ।’, असा आवाज ऐकू आला. तो ऐकून माझा कंठ दाटून आला आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून चैतन्य ग्रहण करता आल्यामुळे गुरुचरणी कृतज्ञता वाटणे

ज्यांना साक्षात् श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची सेवा करण्याची संधी मिळाली, ते जीव धन्य आहेत. ‘आपण एखादे सद्गुरु किंवा संत यांच्या सेवेत किती कालावधी असणार ?’, ते सर्व ईश्वरनियोजित असते; पण ‘त्यांचा आपल्याला जेवढा सहवास लाभतो, तेवढा वेळ आपण त्यांच्याकडून भरभरून चैतन्य ग्रहण करायला हवे’, असे मला वाटले. ‘मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून पुष्कळ चैतन्य ग्रहण करता आले’, यासाठी मला गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक