साधनेसाठी प्रतिकूल परिस्थितीचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘प्रतिकूल परिस्थितीत साधना कशी होणार ?’, असे काही साधकांना वाटते. त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की, अनुकूल परिस्थितीत साधना करण्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत साधना करणे कठीण असले, तरी चिकाटीने साधना केल्यास अनुकूल परिस्थितीत साधना केल्यावर जेवढे फळ मिळते, त्याच्या पाचपट फळ प्रतिकूल परिस्थितीत साधना केल्यावर मिळते. यामुळेच चिकाटीने साधना करणार्‍या साधकांची आध्यात्मिक उन्नती जलद होत आहे. त्यामुळे अनेक साधक ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठत आहेत, तर काही संतही बनत आहेत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अद्यापही काळ प्रतिकूल आहे. याच काळात त्यासाठी प्रयत्न, म्हणजे समष्टी साधना केल्यास आध्यात्मिक उन्नती जलद होईल.’  – सच्चिदानंद परब्रह्य डॉ. आठवले 

प्रकृतीनुसार साधना केली की, प्रगती लवकर होते आणि आनंद मिळतो ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले