हिंदु संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग असणार्‍या यज्ञयागांचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘महर्षींच्या आज्ञेने मे २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री सुदर्शनयाग (१९.५.२०२२), मृत्यूंजययाग (२०.५.२०२२), श्री बगलामुखीयाग (२४.५.२०२२), श्री प्रत्यंगिरायाग (२५.५.२०२२) आणि श्री चंडीयाग (२६ अन् २७.५.२०२२) करण्यात आले. तसेच २०.५.२०२२ या दिवशी संतांच्या (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) हस्ते श्री कार्तिकेय अन् श्री सिद्धिविनायक या देवतांच्या मूर्तींना अभिषेक करण्यात आला. सनातनच्या आश्रमात झालेल्या यागांच्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

प्रत्येक यागापूर्वी आणि यागानंतर देवतेचे आवाहन केलेला कलश, देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा अन् महर्षींनी तिन्ही गुरूंच्या रक्षणार्थ दिलेले हळदीचे कंद यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. तसेच यागात आहुती दिल्यावर यज्ञकुंडातून निघणारा धूर आणि यागाची विभूती यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचेे विवेचन पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे घटकांतील सकारात्मक ऊर्जा मोजतांना काही घटकांची प्रभावळ २ सहस्र ३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती अचूक मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे अशा घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अचूक मोजण्यासाठी ‘लोलका’चा उपयोग करण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन सारण्या वाचाव्यात.
सौ. मधुरा धनंजय कर्वे

१ अ. यागानंतर पूजेतील देवतेचा कलश, मूर्ती आणि प्रतिमा यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ होणे : विशिष्ट यागात विशिष्ट देवतेला आवाहन करून तिचे पूजन केले जाते, उदा. मृत्यूंजय यागात भगवान शिवाला आवाहन करण्यात येते. देवतेला भावपूर्ण आवाहन करून तिचे पूजन केल्याने तिचे तत्त्व (चैतन्य) पूजेतील कलश, मूर्ती आणि प्रतिमा यांच्यामध्ये आकृष्ट होऊन कार्यरत होते. आश्रमात झालेल्या यागांनंतर पूजेतील कलश, मूर्ती आणि प्रतिमा यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) विलक्षण वाढ झाल्याचे पुढील निरीक्षणांतून दिसून आले.

१ आ. यागानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे : महर्षींच्या आज्ञेने यागातील पूजेच्या मांडणीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा ठेवण्यात येते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीगुरूंच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन केल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील विष्णुतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. त्यामुळे यागानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतिमेतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.४.२०२३)

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

ई-मेल : [email protected]

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/683109.html