
पुणे – येथील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ‘आयुर्वेद उपचार केंद्रा’च्या नावाने चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे. कारवाई करत पोलिसांनी २ महिला, तसेच आयुर्वेद उपचार केंद्राचे मालक आणि व्यवस्थापक यांनाही कह्यात घेतले आहे. आयुर्वेद उपचार केंद्राच्या दोन्ही मालकांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत तेथून १ लाख ५२ सहस्र रुपयांचे भ्रमणभाषसंच आणि रोख रक्कम जप्त केली आहे. अशा प्रकारचे अवैध धंदे अजून कोणत्या ठिकाणी चालू आहेत ? याचा पोलीस शोध घेत आहेत.
गावात अवैध मद्यविक्री होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येते; मात्र सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? अशा पोलिसांना बडतर्फ करा !
अपघातामागील सत्य ४ वर्षांनंतर बाहेर येणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
‘नशामुक्त’ राज्य ?
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने पुणे विद्यापिठाच्या खानावळीचा परवाना रहित