‘२.६.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घेतलेल्या भक्तीसत्संगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाचे वर्णन केले. त्या वेळी मला हा रथोत्सवाचा सोहळा सूक्ष्मातून जवळून अनुभवता आला. त्या वेळी काही क्षणांसाठी ‘मी तो सर्व साधकांच्या समवेत पहात आहे आणि ते सर्व क्षण मी अनुभवत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला गुरुदेवांची अमृतदृष्टीही अनुभवता आली. या भक्तीसत्संगापूर्वी ‘आपल्याला हा रथोत्सवाचा सोहळा अनुभवायला मिळायला हवा किंवा त्याची चित्रफीत (‘व्हिडिओ’) तरी पहायला मिळावी’, असे विचार माझ्या मनात सतत यायचे; परंतु हा भक्तीसत्संग ऐकल्यावर ते विचार नष्ट झाले.
अनंत कोटी ब्रह्मांडनायक अशा साक्षात् श्रीगुरूंची ही कृपा आहे. त्यांनीच जगभरातल्या सर्व साधकांना ही अनुभूती मिळावी, यासाठी हे नियोजन केले आहे. गुरुदेवांनी केलेल्या या कृपेसाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |