काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांची काँग्रेसवर टीका !

खासदार असदुद्दीन ओवैसी

बेंगळुरू (कर्नाटक) – बाबरी पाडल्यानंतर काँग्रेसने एक ठराव संमत करत मुसलमानांना आश्‍वासन दिले होते की, त्या ठिकाणी बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येईल. आज त्या जागेवर काय बांधले जात आहे ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसला विचारला आहे. कर्नाटक निवडणूक तोंडावर असतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘काँग्रेस पक्ष आश्‍वासने देतो आणि पुढे ती हवेत विरतात’, असेही औवैसी यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्‍या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?