म्हादई जलवाटप तंटा
पणजी, २ मे (वार्ता.) – कर्नाटकमधील काँग्रेसने २ मे या दिवशी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान वचननामा घोषित केला आहे आणि यामध्ये कृषीक्षेत्रासाठी पुढील ५ वर्षांसाठी १ लाख ५० सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये म्हादईचे पाणी वळवणारा वादग्रस्त कृषीप्रकल्प ‘म्हादई अँड मेकेदातू’ याचा समावेश आहे.
Karnataka polls: Vijai hits out at BJP over Mhadei https://t.co/WoxpDzEbkl
— TOI Goa (@TOIGoaNews) May 2, 2023
कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत म्हादई प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे, तसेच म्हादईवर एकूण ३ सहस्र कोटी रुपये खर्च करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या वचननाम्यात ‘समान नागरी कायदा’, १० लक्ष नोकर्या, गृहलक्ष्मी आदी योजनांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे या दिवशी, तर मतमोजणी १३ मे या दिवशी होणार आहे.