परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या वेळी हरियाणा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

१. श्रीमती वंदना सचदेवा, फरीदाबाद, हरियाणा.

अ. ‘१५.५.२०२० या दिवशी हा सोहळा चालू असतांना मी देहभान विसरले होते. माझी भावजागृती होऊन मला हलकेपणा जाणवत होता.’

२. श्रीमती पूनम अरोडा, फरीदाबाद, हरियाणा.

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मानस नमस्कार केल्यावर भावजागृती होणे आणि साधना करवून घेण्याविषयी प्रार्थना होणे : ‘सोहळ्याच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मानस नमस्कार करतांना माझा भाव जागृत झाला. त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘आता मला सर्वकाही मिळाले. आणखी काय मागू ? श्रीकृष्णाने संत मीराबाईला त्याच्यात सामावून घेतले होते, तसे आपणही माझ्या मनाला आपल्या चरणी सामावून घ्या आणि या देहाकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना करवून घ्या.’ आपल्या कोमल चरणी कोटीश: कृतज्ञता !’

३. कु. टीना खेरा, यमुनानगर, हरियाणा. 

३ अ. ‘सोहळ्याच्या वेळी सूत्रसंचालक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगत असतांना माझी भावजागृती झाली.

३ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या पादुका माझ्या हृदयकमली आहेत’, असे मला वाटले आणि माझी पेशीन्पेशी आनंदी झाली.

३ इ. परात्पर गुरुदेवांना वेगवेगळ्या रूपांत पाहून मला पुष्कळ आनंद होत होता.

३ ई. त्यांना स्मितहास्य करतांना पाहून मला वाटत होते, ‘मी लहान मुलगी आहे आणि ते माझ्याकडे पाहून हसत आहेत.’

३ उ. त्यांची प्रीती अनुभवून मला पुष्कळ चांगले वाटत होते. त्या वेळी माझ्याकडून ‘मला त्यांच्या चरणी स्थान मिळावे’, अशी प्रार्थना झाली.

३ ऊ. सोहळ्याच्या वेळी भावार्चना करत असतांना आलेल्या अनुभूती

३ ऊ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विशाल रूप दिसणे आणि त्यांच्या चरणांवर कमलपुष्प वहातांना त्यांचे चरण कमळापेक्षाही कोमल असल्याची जाणीव होणे : सोहळ्यात सूत्रसंचालक भावार्चना सांगत असतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विशाल रूप दिसले. मी मुंगीएवढी लहान होऊन त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर बसले होते. त्यांचे रूप एवढे मोठे दिसत होते की, ‘मी त्यांच्या नखापेक्षाही लहान आहे’, असे मला दिसत होते. मला केवळ त्यांचे चरणच दिसत होते. त्यांच्या चरणांवर कमलपुष्प वहायला सांगितल्यावर ‘परात्पर गुरुदेवांचे चरण त्या कमळावर आहेत आणि त्यांचे चरण कमळापेक्षाही अधिक सौम्य अन् कोमल आहेत’, याची मला जाणीव झाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३ ऊ २. ‘स्वतःचे अश्रू प्रभुचरणी अर्पण करत आहे’, असे वाटणे : भावार्चनेच्या वेळी ‘जलदेवता परात्पर गुरुदेवांना स्पर्श करण्यासाठी आली आहे’, असे सांगण्यात आले. तेव्हा ‘माझ्यातही जलांश असून मी माझे अश्रूच प्रभुचरणी अर्पण करत आहे’, असे मला वाटले. नंतर भावार्चनेच्या वेळी सांगण्यात आले, ‘‘आपले भावाश्रू अर्पण करावेत आणि जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.’’ तेव्हा ‘ईश्वराने माझ्याकडून ही कृती आधीच करून घेतली’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३ ऊ ३. त्यानंतर जेव्हा भावार्चनेत सांगितले, ‘‘वायुदेवाने फुलांचा सुगंध आणला.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मी काय करू शकते ?’ त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘भगवंता, माझ्या देहातील एकेक भाग पुष्प बनून आपल्या चरणी अर्पण होऊ दे.’

३ ऊ ४. शंखनादाच्या वेळी मला बासरीचे सूर ऐकू येत होते. तेव्हा मला वाटले, ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसले आहे.’

३ ऊ ५. भावार्चनेत ‘सूर्यदेव परात्पर गुरु डॉक्टरांची आरती करण्यासाठी आला आहे’, असे सांगितल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांना बसण्यासाठी आसन दिले. तेव्हा मला त्यांचा हसतमुख चेहरा दिसला. त्या वेळी मला एवढा आनंद होत होता की, ‘तेथेच राहून त्यांची सेवा करावी’, असे मला वाटत होते.

३ ऊ ६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्पवृष्टी होत असतांना पुष्प होऊन समर्पित होण्यासाठी प्रार्थना होणे : परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना मला वाटत होते, ‘ते माझ्या समोरच आहेत आणि पुष्पवृष्टी माझ्या समोरच होत आहे.’ माझ्या मनात विचार आला, ‘तेथे एवढी फुले आहेत; परंतु माझ्याकडे तर थोडीच फुले आहेत.’ तेव्हा मला वाटले, ‘परात्पर गुरुदेव, आम्ही सर्व साधक आपल्या उद्यानातील पुष्प आहाेत. तुम्ही आम्हाला साधनारूपी जल दिले आहे. आपली सेवा म्हणून मी आपल्या चरणी पुष्परूपात समर्पित होईन.’

३ ए. सोहळ्यात स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगितल्यावर त्याला पूर्वी महत्त्व दिले न गेल्याने क्षमायाचना करणे : सोहळ्यात स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व सांगितल्यावर माझ्याकडून ईश्वरचरणी क्षमायाचना झाली, ‘मी पूर्वी प्रक्रियेला काही महत्त्व देत नव्हते, तरीही आपण एवढी कृपा केली की, आपण आम्हाला शिकवण्याचे थांबवले नाहीत.’ नंतर मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी मानस तुलसीदल अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.

३ ऐ. भजनाच्या प्रत्येक ओळीतून वेगळीच स्पंदने जाणवणे आणि त्यातील चैतन्यामुळे आनंद घेता येणे : मला पूर्वी भजन ऐकायला आवडत नव्हते; परंतु आज मला भजनाच्या प्रत्येक ओळीतून वेगळीच स्पंदने जाणवली आणि ते एवढ्या चैतन्याने भरलेले होते की, ‘माझी पेशीन्पेशी त्यातील आनंद घेत आहे’, असे मला वाटले. सर्वकाही सुंदर आणि आनंदमय होते.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक