अकोला येथे निर्जनस्थळी नेऊन अंध महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

अकोला – येथे अंध दांपत्याला निर्जनस्थळी नेत महिलेवर तिच्याच पतीसमोरच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर अंध दांपत्याने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली आहे. या प्रकरणाचे अधिक अन्वेषण चालू आहे.

हे दांपत्य रेल्वे स्थानकावरून त्यांच्या मुलीला भेटायला रिक्क्षाने जात होते; मात्र रिक्शा अर्ध्या वाटेतच बंद पडल्यामुळे ते पुन्हा रेल्वे स्थानकाच्या दिशेने परत येत होते. ‘रेल्वेस्थानकावर नेतो’ असे सांगत आरोपीने अंध दांपत्याला निर्जनस्थळी नेले. या निर्जनस्थळी जिवे मारण्याची धमकी देत अंध महिलेवर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला होता.

संपादकीय भूमिका 

अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !