अशी ‘ममता’ नकोच !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) बॅनर्जी या त्यांच्या हिंदुद्वेषासाठी प्रसिद्ध आहेत. ‘सातत्याने मुसलमानांना झुकते माप देऊन हिंदूंवर अत्याचार करण्यासाठीच त्या जणू निवडून आल्या आहेत’, अशा आविर्भावात वावरतात. रामनवमीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्क रामभक्तांनाच चेतावणी दिली ! त्या म्हणाल्या, ‘‘जर रामनवमीच्या वेळी शस्त्रे घेऊन मुसलमान भागात आक्रमण केले, तर कठोर कारवाई करण्यात येईल. मुसलमान रमझानच्या काळात चुकीचे काहीच करत नाहीत.’’ बंगाल येथील बहुसंख्य हिंदूंवर ममता(बानो) यांचा केवढा अविश्वास आणि धर्मांधांवर केवढा जीवघेणा विश्वास ! झाले मात्र एकदम उलटेच. रामनवमीच्या वेळी धर्मांधांनीच शस्त्रे, काठ्या, दगड यांद्वारे हिंदूंवर आक्रमण केले; पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. बंगाल येथील स्थानिक हिंदूंनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये धर्मांधांचा जमाव हिंदूंची घरे, दुकाने, वस्त्या यांवर अधिक संख्येत उपस्थित असलेल्या पोलिसांच्या समोर आक्रमण करत असतांना पोलीस मात्र काहीच कारवाई न करता केवळ पहात उभे असल्याचे दिसले. ममता(बानो) म्हणाल्या होत्या की, मुसलमान रमझानच्या काळात काहीच चुकीचे करत नाही, म्हणजे ‘मुसलमानांनी बंगालच्या हावडा भागाला पेटवले, ते योग्यच आहे’, असेच त्या एका अर्थाने सांगतात. मुसलमानांच्या सर्व गैरकृत्यांना मूक नव्हे, तर उघड उघड पाठिंबाच एका राज्याच्या मुख्यमंत्री महिलेकडून दिला जाणे, हे अचंबित करणारे नव्हे, तर संताप आणणारे आहे.

षड्यंत्राची माहिती मिळूनही हिंदूंनाच धमकावणी ममता(बानो) यांनी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना चेतावणी द्यावी, त्यानंतर रामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी दंगली घडवून हिंदूंच्या साधन-संपत्तीची जाळपोळ करावी आणि त्यानंतर त्वरितच ‘मी आधीच चेतावणी दिली होती’, असे सांगणे, हा घटनाक्रम काय सांगतो ? ममता(बानो) या राज्याच्या मुख्यमंत्री असल्याने त्यांना गुप्तचरांकडून रामनवमीच्या कालावधीत धर्मांध हिंसाचार करतील, याची पूर्वकल्पना मिळाली असणार. बंगाल येथील धर्मांधांची पराकोटीची खुनशी वृत्ती त्यांना माहिती आहे. अशा वेळी धर्मांधांवर कारवाई वा त्यांची धरपकड करण्याऐवजी उलट निष्पाप हिंदूंनाच चेतावणी देणे, हे धर्मांधांच्या लांगूलचालनाचे द्योतक आहे. पुन्हा प्रतिक्रिया व्यक्त करतांना ममता(बानो) ‘मुसलमान निष्पाप आहेत’, यावरच भर देऊन ‘जे कुणी (म्हणजे हिंदू) हिंसाचारामध्ये सहभागी आहेत, त्यांचे काहीही ऐकले जाणार नाही. मी पोलिसांना हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश देत आहे’, असे विधान करणे, हेसुद्धा चीड आणणारे आहे. दंगलखोर मुसलमानांना पाठीशी घालून निरपराध रामभक्त हिंदूंनाच दंगलींसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हा प्रकार आहे. बंगालच्या विविध भागांत झालेल्या या दंगलींचे प्रत्यक्ष अन्वेषण करणे, दंगलखोर ओळखणे, षड्यंत्र काय रचले होते ? याची माहिती घेणे असे काहीही न करता थेट निर्णयात्मक आणि कारवाईचे आदेश देणे, हा पोलिसांचे कारवाई करण्यापूर्वी हात बांधण्याचा अन् समाज, देश यांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात वर्ष १९२१ मध्ये मोपला (केरळ) येथील धर्मांधांनी हिंदूंविरुद्ध दंगली चालू केल्या. हिंदूंची नृशंस हत्याकांडे करण्यात आली, हिंदूंची घरे, साहित्य पेटवण्यात आले. त्यांना रहात्या घरातून पळवून लावण्यात आले. हे अत्याचार म. गांधी यांच्यापर्यंत पोचल्यावर हिंदूंना साहाय्य करण्याऐवजी त्यांनी ‘मोपले त्यांच्या धर्माप्रमाणे वागले. मला काय त्याचे ?’, अशा स्वरूपाचे विधान केले आणि याविषयी हात झटकले. स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणार्‍या रशीदला गांधींनी ‘भाई’ म्हणून उपमा दिली, तर हिंदु महिला, मुली यांच्यावर अत्याचार करणार्‍या धर्मांधांपासून रक्षणासाठीचा ‘उपाय’ सांगतांना याच म. गांधी यांनी हिंदु स्त्रियांनी स्वत:समवेत विषाची कुपी बाळगावी आणि संकटात सापडल्यावर ती पिऊन टाकावी. असेच भयंकर सल्ले ममता(बानो) यांनी हिंदूंना दिले.

राष्ट्रपती राजवट हवीच !

रामनवमीच्या काळात बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे येथील हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दंगली कोण घडवत आहे ? हे ठाऊक असूनही ममता(बानो) धर्मांधांवर कारवाई करण्यास पोलिसांना सांगत नाहीत आणि वर ‘माझे डोळे आणि कान उघडे आहेत. मला सर्व काही दिसत आहे’, असे सांगत पुन्हा हिंदूंनाच दमदाटी करतात. हिंदु समाज किती शांतीप्रिय आहे ? हे ममता(बानो) यांना ठाऊक आहे; मात्र धर्मांधांच्या मतांवर त्या निवडून आल्यामुळे त्यांना धर्मांध सोडून अन्य सर्व हिंसक, आक्रमक दिसतात. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि विशेषत: भाजपच्या कार्यकर्त्यांवर मोठे संकट कोसळले होते. भाजपच्या अनेक पदाधिकार्‍यांच्या हत्या झाल्या, महिला कार्यकर्त्यांवर सामूहिक बलात्कार करून त्यांना ठार करण्यात आले. तरी हे सर्व गुन्हे पचवण्यात आले. दुर्गापूजेच्या मंडपांवर आक्रमणे, सरस्वतीदेवी विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण हे ममता(बानो) यांच्याच कार्यकाळात झाले आहे. यांपैकी एकाही आक्रमणाचा, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येचा ते मुसलमानांनी केल्याचे ठाऊक असूनही एकदाही निषेध का केला नाही ? मुसलमानांना चेतावणी देण्याची धमक ममता(बानो) यांनी का दाखवली नाही ? ममता(बानो) यांना निवडून देणे ही चूक होती, हे आतातरी बंगाल येथील हिंदूंच्या लक्षात आले आहे का ? हिंदू त्याविरुद्ध आवाज उठवणार का ? कि ममता(बानो) या त्यांना अजूनही त्यांच्या तारणहार वाटतात. हिंदूंना कधी कळेल ना कळेल; मात्र बंगालमधील निष्पाप हिंदूंचे उत्तरदायित्व जेवढे तेथील सरकारचे आहे, तेवढेच ते केंद्र सरकारचेही आहे. केंद्राने तेथील हिंदूंची केविलवाणी स्थिती लक्षात घ्यावी आणि लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंचे रक्षण करावे, ही अपेक्षा !

हिंदूंना धर्मांधांच्या हाती मरण्यास सोडणारी ममता(बानो) यांची रझाकारी राजवट केंद्राने संपुष्टात आणावी, ही हिंदूंची अपेक्षा !