‘सनातन धर्माला कीड’ म्‍हणणारे राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांना अनावृत्त पत्र !

महोदय,

माझ्‍यासारख्‍या तुच्‍छ व्‍यक्‍तीने आपल्‍याला पत्र लिहावे,  अशी माझी पात्रता नाही. हे मी आधीच नमूद करतो आहे; कारण आपण एका राष्‍ट्रीय पक्षाचे निवडून आलेले लोकसेवक आहात आणि मी एक सामान्‍य मानव आहे. आजवर आपण वारंवार वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करत आला आहात आणि माझ्‍यासारखे लोक ‘आपले निखळ अज्ञान आहे’, असे समजून त्‍याकडे दुर्लक्ष करत आले आहेत; परंतु आपले कुणीही खंडण केले नाही, म्‍हणजे ‘आपण बोलतो तो प्रत्‍येक शब्‍द हा प्रमाण आहे’, असा आपला भ्रम झाला आहे. आपला हा गैरसमज दूर करण्‍यासाठी हा पत्रप्रपंच !   सध्‍या आपण ‘सनातन धर्म’ या संकल्‍पनेला मनसोक्‍त शिव्‍या घालत आहात आणि ‘सनातन धर्म अवैज्ञानिक आहे’, अन् बरेच काही बोलत आहात; म्‍हणून आपल्‍याला अत्‍यल्‍प अन् अत्‍यंत प्राथमिक अशा गोष्‍टी सांगतो.

१. हिंदु आणि सनातन धर्म हा एकच

सूत्र क्रमांक १ म्‍हणजे धर्म या संकल्‍पनेचा विस्‍तार होतांना तो ‘सत्‍य धर्म’, ‘सत्‍य सनातन धर्म’, ‘सत्‍य सनातन वैदिक धर्म’, ‘हिंदु धर्म’ अशा पद्धतीने झालेला आहे. ‘सत्‍य धर्म’ या वटवृक्षाच्‍याच पारंब्‍यांचा कालानुरूप विस्‍तार होत आजचा हिंदु धर्म निर्माण झाला आहे. त्‍यामुळे हिंदु आणि सनातन धर्म वेगळा या पद्धतीच्‍या थापा कृपा करून मारू नका. हे बोलणे म्‍हणजे तुम्‍ही तुमचे वडील हयात नाहीत, याचा लाभ घेऊन तुमच्‍याच आजोबांना अत्‍यंत अश्‍लील भाषेत शिवीगाळ करणे, असे आहे. सभ्‍य आणि सुसंस्‍कृत लोक अशी चूक टाळतात.

२. हिंदु धर्मातील वैज्ञानिकता

दुसरे सूत्र म्‍हणजे ८४ लक्ष योनींचा प्रवास करून आल्‍यावर मानवी देह मिळतो, हे आपल्‍याकडे वारंवार सांगितले गेले आहे. तुम्‍ही शास्‍त्रीय माहिती मिळवा. ‘पृथ्‍वीवर अस्‍तित्‍वात असलेल्‍या एकूण जीवांचे प्रकार ८७ लाख आहेत’, असे सांगितले आहे आणि त्‍यातील काही उपप्रकार आहेत, हेही पण सांगितले जाते. थोडक्‍यात ८४ लक्ष योनी ही संकल्‍पना जिचा वारंवार ऊहापोह होतो, ती सत्‍य आहे, हे सिद्ध होते.

३. पृथ्‍वी आणि सूर्य यांचा परस्‍परांशी असलेला संबंध महाभारतापासून ज्ञात असणे

तिसरे सूत्र म्‍हणजे महाभारतात एक ‘सनतसुजातीय’ नावाचा खंड आहे. त्‍यात धृतराष्‍ट्र आणि भगवान सनतकुमार यांची चर्चा आहे. त्‍यात धृतराष्‍ट्र सनतकुमारांना विचारतो, ‘‘शास्‍त्रातील विचार हे प्रमाण का मानायचे ?’’ सनतकुमार त्‍याला उत्तर देतात, ‘‘व्‍यावहारिक सत्‍य हे बर्‍याचदा मिथ्‍या सिद्ध होते आणि शास्‍त्र विचार हा चिंतनातून प्रकटतो; म्‍हणून तो सत्‍य असतो. उदाहरण म्‍हणजे व्‍यवहारात आपण सूर्य उगवतांना आणि मावळतांना बघतो; परंतु शास्‍त्रात मात्र सूर्य निश्‍चल आहे अन् पृथ्‍वी त्‍याच्‍या भोवती फिरते आहे, असेच उल्लेखिलेले आहे आणि ते सत्‍य आहे.’’

महाभारत म्‍हणजे द्वापरयुगाचा अंत. थोडक्‍यात आजपासून ५ सहस्र ३०० वर्षांपूर्वी ‘सूर्य निश्‍चल आहे आणि पृथ्‍वी त्‍याच्‍या भोवती फिरते’, हे सत्‍य आपल्‍याला ज्ञात होते. या सनतसुजातीय खंडावर आद्यशंकराचार्यांनी आजपासून २ सहस्र ४०० वर्षांपूर्वी भाष्‍य केले होते. त्‍या वेळी याच मुद्याचा त्‍यांनी पुनरुच्‍चार केला आणि विवेचन केले आहे. आजपासून ७०० वर्षांपूर्वी संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी जी ‘भावार्थ दीपिका’ लिहिली, त्‍यातही त्‍यांनी हाच मुद्दा मांडला आहे. तुमच्‍या लाडक्‍या गॅलिलियोच्‍याही २०० वर्षे आधी हे सत्‍य आपल्‍याला ज्ञात होते.

४. बीजगणित आणि भूमिती यांचा विकास भारतभूमीतूनच !

चौथे सूत्र म्‍हणजे ‘पाश्‍चात्त्य मंडळींनी गणिताचा प्रचंड अभ्‍यास केला आणि विकास घडवला’, हा एक आपल्‍यासारख्‍या मंडळींचा गोड गैरसमज असतो. भारतियांनी केवळ शून्‍याचा शोध लावलेला नाही, तर संपूर्ण बीजगणित आणि भूमिती यांचा विकास आपल्‍याच भूमीत झाला आहे. आपल्‍याकडून अरब शिकले आणि त्‍यांनी पुढे हे गणित युरोपात नेले. युरोपियन लोकांनी त्‍याला ‘अल-जेब्रा’ असे नाव दिले; कारण त्‍यांना ते अरबांनी शिकवले; पण अरब लोक मात्र गणिताला ‘हिंद़्‍सा’ म्‍हणतात. याचाच अर्थ हिंदमधील लोकांनी शिकवलेली पद्धत.

५. ‘पृथ्‍वी गोल आहे’, हे ५ सहस्र ३०० वर्षांपासून ज्ञात असणे

पाचवे सूत्र म्‍हणजे आपल्‍याकडे श्रीविष्‍णूच्‍या वराह अवताराचा उल्लेख आहे. दक्षिण भारतात ३ सहस्र वर्षे पुरातन असे एक मंदिर आहे. तिथे श्रीविष्‍णूच्‍या वराह अवताराचे शिल्‍प दगडात कोरले आहे आणि त्‍यात वराहाने आपल्‍या सुळ्‍यांवर पृथ्‍वी तोलून धरली आहे अन् ती गोल आहे. अर्थात् ‘पृथ्‍वी गोल आहे’, हे आपल्‍याला सहस्रो वर्षांपासून ज्ञात आहे. हे शिल्‍प ३ सहस्र वर्षे जुने आहे; पण आपली पुराणे कमीत कमी ५ सहस्र ३०० वर्षे जुनी आहेत आणि त्‍यात हा उल्लेख वारंवार आलेला आहे. आपण ‘भूगोल’ हाच शब्‍द वापरतो. यात भूमी गोल आहे, हे आपल्‍याला स्‍पष्‍ट ज्ञात आहे, याचाच उल्लेख होतो.

६. वनस्‍पती शब्‍दाचे ज्ञान वेदांपासून असणे

सहावे सूत्र म्‍हणजे आपल्‍याकडे देवाच्‍या पूजेत आपण वनस्‍पती वापरतो. वनस्‍पती आणि झाडे हे दोन वेगवेगळे शब्‍द आहेत. वनस्‍पतीच का वापरतो ? तर सामान्‍यतः कोणत्‍याही झाडाला, वेलीला फुले येतात. परागीकरण प्रक्रिया होते आणि त्‍यानंतर त्‍या झाडाला फळे येतात, ज्‍यातून त्‍या झाडाचे जैविक चक्र अव्‍याहत चालू रहाते; पण वनस्‍पती वेगळ्‍या आहेत. त्‍यांना दृश्‍य स्‍वरूपात फुले येत नाहीत, तर थेट फळेच लागल्‍याचे दिसून येते. वनस्‍पतींचे हे वेगळेपण लक्षात घेऊन आपल्‍या ऋषींनी त्‍यांना देवाच्‍या पूजेत वापरले आहे.

‘वनस्‍पती’ या शब्‍दाची आजच्‍या वनस्‍पतीशास्‍त्रात दिलेली व्‍याख्‍या : Vanaspati is the Sanskrit word that now refers to the entire plant kingdom. However, according to Charaka Samhita and Sushruta Samhita medical texts and the Vaisesikas school of philosophy, ‘vanaspati’ is limited to plants that bear fruits but no evident flowers. (‘वनस्‍पती’ हा संस्‍कृत शब्‍द आहे की, जो संपूर्ण वनस्‍पती साम्राज्‍याचा संदर्भ देतो. तथापि ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ हे वैद्यकीय ग्रंथ अन् ‘वैसेसिक स्‍कूल ऑफ फिलॉसॉफी’ यांच्‍यानुसार वनस्‍पती फळे देणार्‍या; परंतु स्‍पष्‍ट फुले नसलेल्‍या वनस्‍पतींपुरते मर्यादित आहे.) वेदांमधील विज्ञान आणि शेती यांविषयी जर मी तुम्‍हाला समजवायला बसलो, तर तुमचे आयुष्‍य संपेल; पण माझे सांगणे संपणार नाही. मी दिलेली उदाहरणे लेशमात्र आहेत. त्‍यामुळे पाश्‍चात्त्य मंडळींच्‍या ओंजळीने विज्ञान पिण्‍याचे घाणेरडे उद्योग बंद करा.

७. सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवर टीका अन् हिंदु धर्माला चांगले म्‍हणणे हा दुटप्‍पीपणा !

‘तुमचे पूर्वसुकृत चांगले आहे म्‍हणून तुम्‍ही या भारतभूमीवर, मराठी आई-वडिलांच्‍या पोटी हिंदु धर्मात जन्‍माला आला आहात. तुमच्‍या पाठीशी लक्षावधी वर्षांचा ऋषी परंपरेचा ज्ञानाचा वारसा आहे’, याविषयी अभिमान बाळगला पाहिजे; पण तुमची अवस्‍था जॉर्ज वॉशिंग्‍टन यांच्‍यासारखी झालेली आहे. तुमच्‍या हातात कुर्‍हाड आलेली आहे आणि तुम्‍ही स्‍वतःचीच मुळे कापून काढण्‍याला मर्दुमकी समजत आहात. तुम्‍ही सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवर टीका करणार अन् हिंदु धर्माला चांगले म्‍हणणार, हा दुटप्‍पी व्‍यवहार आहे. हे तुम्‍ही कदाचित् अज्ञानापोटी म्‍हणत असाल, तर हा लेख आपले डोळे उघडेल. जर तुम्‍ही हे जाणीवपूर्वक समाजात विद्वेष पसरवण्‍याचा हेतूने करत असाल, तर तुम्‍हाला स्‍वतःच्‍या वर्तनाची लाज वाटावी, यासाठी हा अनावृत पत्र प्रपंच केला आहे.

८. स्‍वधर्म आणि संस्‍कृती यांच्‍या मुळावर उठणे हे क्‍लेशदायक !

आजवरचा आपला (जितेंद्र आव्‍हाड यांचा) लौकिक लक्षात घेता आपल्‍यात सुधारणा होण्‍याची शक्‍यता बिलकुल नाही; परंतु तरीही रहावत नाही म्‍हणून आपल्‍याला आरसा दाखवण्‍याचा प्रयत्न केला आहे. काही लाख लोक ज्‍याला निवडून देतात, असा लोकप्रतिनिधी आपलाच धर्म आणि संस्‍कृती यांच्‍या मुळावर उठणे, हे क्‍लेशदायक आहे; म्‍हणून हा संवाद साधत आहे. या निमित्ताने महाराष्‍ट्रातील जी ‘पुरोगामी’ नावाची ‘हिंदुद्वेषी जमात’ आहे, त्‍यांना सुद्धा थोडा आरसा दाखवण्‍याचा प्रयत्न करतो आहे. पूर्वग्रहाची झापडे काढून जर सनातन धर्माचा अभ्‍यास चालू केला, तर तुमच्‍या आयुष्‍यात निश्‍चित पालट घडेल.

९. …तर अन्‍य धर्म स्‍वीकारून सनातन धर्मरूपी किडीपासून स्‍वतःचे रक्षण करावे !

‘धारयति इति धर्मः’ ही सनातन धर्माची व्‍याख्‍या आहे. ‘जो धारण करण्‍यायोग्‍य आहे तो धर्म’, असे सनातन धर्म सांगतो. तुम्‍ही भाग्‍यवान आहात की, तुम्‍हाला जन्‍माने हा धर्म धारण करायला मिळाला आहे. हा धर्म, संस्‍कृती आणि परंपरा यांचे ओझे त्‍याच व्‍यक्‍तीला वाटू शकेल, जो मानव आणि दानव या दोन्‍ही अवस्‍थांच्‍या पलीकडे जाऊन पशुत्‍वाला प्राप्‍त झाला असेल; कारण आमच्‍या संस्‍कृतीत रावण असेल किंवा हिरण्‍यकश्‍यपू वा अन्‍य कुणीही राक्षस असो यांच्‍यापैकी कुणालाही सनातन धर्म हा कीड वाटला नाही. आपल्‍यातील पशुत्‍व इतके प्रबळ झाले असेल, तर माझी आपल्‍याला विनंती आहे की, पशूंचे २ धर्म हे आजचे जगातील सर्वाधिक मोठे दोन धर्म आहेत, त्‍यांपैकी एखादा धर्म आपण स्‍वीकारावा आणि सनातन धर्मरूपी किडीपासून स्‍वतःचे रक्षण करावे.

– सुजीत भोगले, एक धर्मप्रेमी.

(साभार : सामाजिक माध्‍यम)

तळटीप – मित्र मंडळींना विनंती, जितेंद्र आव्‍हाड यांच्‍यापर्यंत हा लेख जरूर पोचवा. त्‍यांना सांगा सनातन धर्म या विषयावर त्‍यांच्‍याशी शास्त्रार्थ करायला मी ते सांगतील त्‍या व्‍यासपीठावर यायला तयार आहे.