धर्मप्रेमी युवक-युवतींचे मोठे संघटन उभे करणारे धारकरी श्री. तेजस शिवरकर !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सासवड येथील धारकरी श्री. तेजस शिवरकर यांनी संपूर्ण बलीदान मास काळात सासवड भागातील गणेशोत्सव मंडळे आणि विविध चौकांमध्ये ‘बलीदान मास वंदना’ घेतली. यासह ‘गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या प्रवचनांचे नियोजन केले होते. हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सासवडमध्ये गुढी उभारली आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या हिंदु धर्माच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान केले, त्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्येयाने त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. श्री. तेजस शिवरकर यांनी धर्मप्रेमी तरुण युवक-युवतींचे मोठे संघटन उभे केले आहे.