साधारण १ वर्ष ४ मासांपूर्वी मला होत असलेल्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आणि माझ्या साधनेचे प्रयत्न न्यून झाले. त्या वेळी माझी विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा चालू होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ही सेवा पालटून अन्य सेवा करण्यास सांगितली. त्यानंतर मी नामजपादी उपाय आणि स्वतःच्या साधनेवर लक्ष केंद्रित केले.
या प्रसंगानंतर साधारण ४ – ५ मासांनी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, साधनेचे प्रयत्न किती होत आहेत ? मी त्यांना म्हणालो, ५० टक्के हे ऐकून परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, जेव्हा तुझे प्रयत्न ७० ते ८० टक्के इतके होतील, तेव्हा तुझी पूर्वीची ज्ञान मिळवण्याची सेवा प्रारंभ कर. त्यानंतर १ वर्षे ४ मासांनी अकस्मात् मला जाणवले की, माझे साधनेचे प्रयत्न ७० टक्के इतके होत आहेत. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून माझ्या साधनेची स्थिती समजते. ते योग्य वेळी मला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा करण्यास सांगतील. त्यासाठी त्यांना या विषयी वेगळे विचारण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर २ दिवसांतच परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्याची सेवा परत प्रारंभ करण्यास सांगितले.
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (३०.१०.२०२१)
|