‘१४ मार्च २०२३ या दिवशी सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले. ही वार्ता मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने सौ. मनीषा पाठक यांच्या संतपदाचा दैवी सोहळा माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि देवाने माझ्याकडून या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतले.
१. संतसोहळा आरंभ होण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी श्रीकृष्णाचे तत्त्व कार्यरत होणे : संतसोहळा आरंभ होण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्णाचे निळसर रंगाच्या तेजस्वी प्रकाश स्वरूपातील तत्त्व कार्यरत झाले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी कृष्णलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण होऊन तेथे पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता. पृथ्वीवर निर्माण झालेले हे कृष्णलोकातील वायूमंडल अनुभवण्यासाठी पुण्यात्मे, स्वर्गलोकातील देवता आणि महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथील काही ऋषिमुनी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून उपस्थित झाले होते. कार्यक्रमाला स्थुलातून उपस्थित असणार्या पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांप्रमाणेच पुण्यात्मे, कनिष्ठ देवता आणि ऋषिमुनी यांना ‘कोणता कार्यक्रम आहे ?’, याची उत्सुकता लागली होती.
२. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांच्या घेतलेल्या साधनाप्रवासाच्या मुलाखतीच्या वेळी सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीचे तत्त्व कार्यरत होऊन तिचे चैतन्य त्यांच्या ओजस्वी वाणीतून कार्यक्रमस्थळी पसरणे : कार्यक्रमाच्या
आरंभी सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांच्या साधनाप्रवासाची मुलाखत घेतली. तेव्हा सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीचे तत्त्व कार्यरत होऊन तिचे चैतन्य त्यांच्या ओजस्वी वाणीतून कार्यक्रमस्थळी पसरले. त्यामुळे या कार्यक्रमस्थळी चैतन्याचे संरक्षककवच निर्माण झाले आणि कार्यक्रमाचा स्तर मानसिक आणि बौद्धिक स्तरावरून आध्यात्मिक स्तरापर्यंत पोचला. त्यामुळे हा कार्यक्रम दिव्य असल्याची अनुभूती साधकांना येऊ लागली.
३. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करणे : सद़्गुरु स्वाती खाडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सौ. मनीषा पाठक यांनी संतपद प्राप्त केल्याचा संदेश वाचून दाखवला. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची परात्पर वाणी सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या माध्यमातून कार्यरत होऊन त्यांच्या वाणीतून निर्गुण स्तरावरील शांतीयुक्त चैतन्य वातावरणात पसरले. त्यामुळे उपस्थित साधकांना प्रथम संतपदाची घोषणा झाल्याचा आनंद झाला आणि सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या वाणीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा लाभ झाल्याने शांतीची अनुभूती आली. अशाप्रकारे गुरुमाऊलीच्या कृपेने साधकांना आनंद आणि शांती यांची संमिश्र अनुभूती आली.
४. संतपदाची घोषणा झाल्यावर पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संदर्भात आध्यात्मिक स्तरावर घडलेली प्रक्रिया : सौ. मनीषा पाठक यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वी त्यांची कुंडलिनीशक्ती त्यांच्या आज्ञाचक्रापर्यंत पोचली होती. जेव्हा त्यांच्या संतपदाची घोषणा करण्यात आली, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा आशीर्वादरूपी कल्याणकारी असणारा महासंकल्प कार्यरत झाला. त्यामुळे पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवास उर्ध्व दिशेने होऊन तो सहस्रारचक्रापर्यंत पोचला आणि त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली. तेव्हा त्यांच्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी असणारे पांढर्या रंगाचे सहस्रदलकमल उमलले आणि त्यांच्या सहस्रारचक्रातून ज्ञानाचा पिवळसर आणि निर्गुण-सगुण चैतन्याचा पांढरा असा संमिश्र दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्यामुळे त्यांचे मुखकमल दिव्य तेजाने उजळून गेले आणि त्यांच्या मस्तकाभोवती पिवळसर पांढर्या रंगाचे तेजोमय प्रकाशवलय कार्यरत झाले. साधकांनी सौ. मनीषा पाठक यांच्या मुखमंडलावरील दिव्य तेजाचे दर्शन घेतल्यामुळे त्यांचा गुरुमाऊलीच्या प्रती असणारा भक्तीभाव वाढून त्यांना आनंदाची अनुभूती आली. सौ. मनीषा पाठक यांच्या मस्तकाभोवती गोलाकारात फिरणार्या पिवळसर पांढर्या रंगाच्या तेजोमय प्रकाश वलयामुळे पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या भोवती चैतन्यमय संरक्षककवच कार्यरत होऊन त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात जनलोकातील वायुमंडल कार्यरत होऊन वातावरणाची शुद्धी झाली. अशाप्रकारे जेव्हा एक साधक संतपद प्राप्त करतो, तेव्हा संतांचे दर्शन घेतल्यामुळे साधकांना व्यष्टी स्तरावर आणि संतांच्या अस्तित्वामुळे सभोवतालच्या वातावरणाला समष्टी स्तरावर आध्यात्मिक लाभ होतात.
५. संतपद प्राप्त केल्याचे ऐकल्यावर पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव दाटून येणे आणि तो अश्रूधारांच्या रूपात प्रगट होणे : संतपद प्राप्त केल्याचे ऐकल्यावर पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव दाटून आला आणि तो अश्रूधारांच्या रूपात प्रगट झाला. तेव्हा पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यातील शिष्यभावामुळे त्यांचे भावाश्रू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर सूक्ष्मातून अर्पण होऊन त्यांची पांढर्या रंगाची कमळे होऊन ती श्रीगुरुचरणी सूक्ष्मातून वाहिली गेली. यावरून शिष्यरूप संत आणि ‘मोक्षगुरुरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये भक्तीभावाचे निळसर रेशमी बंधनरूपी दृढ अनुसंधान असते’, हे दिसले आणि देवाच्या कृपेने मला त्यांचे आध्यात्मिक नाते अनुभवण्यास मिळाले.
६. सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केल्यावर कार्यक्रमस्थळी देवीलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण होणे : सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना पुष्पहार घालून आणि त्यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान केला. तेव्हा सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या ठिकाणी गुलाबी रंगाच्या कमळामध्ये उभी असलेल्या लक्ष्मीदेवीचे दर्शन झाले आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या ठिकाणी पांढर्या रंगाच्या कमळामध्ये उभ्या असणार्या श्री सरस्वतीदेवीचे दर्शन झाले. त्यामुळे सन्मान सोहळ्याच्या वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी देवीलोकाचे वायूमंडल निर्माण होऊन सर्वत्र तेजस्वी गुलाबी रंगाचा दैवी प्रकाश पसरला आणि कमळ अन् मोगरा या फुलांचा दिव्य सुगंधही सूक्ष्मातून दरवळत होता. त्यामुळे या सोहळ्याचे स्वरूप दिव्यतेकडून दिव्योत्तर झाले. त्यामुळे सद़्गुरु स्वाती खाडये यांना सूक्ष्मतम स्तरावरील परमानंद, पू. (सौ.) मनीषा पाठक यांना सूक्ष्मतर स्तरावरील आत्मानंद आणि उपस्थित साधकांना सूक्ष्म स्तरावरील दिव्यानंद यांची अनुभूती आली.
७. सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी एकमेकींना स्थुलातून नमस्कार केल्यावर सूक्ष्म स्तरावर घडलेली प्रक्रिया : सद़्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी एकमेकींना स्थुलातून नमस्कार केला. जेव्हा पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सद़्गुरु स्वाती खाडये यांना स्थुलातून नमस्कार केला, तेव्हा सूक्ष्मातून सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या ठिकाणी मोक्षगुरुरूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि त्यांना शिष्यरूपातील पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी नमस्कार केला. संतपद प्राप्त केल्याने पू. (सौ.) मनीषा पाठक मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाल्या होत्या. त्यामुळे जेव्हा सद़्गुरु स्वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना नमस्कार केला, तेव्हा पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले आणि त्यांना शिष्यरूपातील सद़्गुरु स्वाती खाडये यांनी नमस्कार केला. अशाप्रकारे ‘संत आणि सद़्गुरु जेव्हा इतरांना नमस्कार करतात, तेव्हा संत अन् सद़्गुरु यांच्यामध्ये शिष्यभाव जागृत असतो आणि जेव्हा संत अन् सद़्गुरु यांना इतर जण नमस्कार करतात, तेव्हा संत आणि सद़्गुरु यांच्यामध्ये गुरुतत्त्व कार्यरत असते’, हे सूत्र शिकायला मिळाले.
८. संतसोहळ्याच्या संदर्भात सूक्ष्म स्तरावर घडलेल्या अन्य काही घडामोडी
अ. संपूर्ण संतसोहळ्यात स्वर्गलोकातील देवता आणि ऋषिमुनी यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यामुळे या पुष्पांचे रूपांतर दैवी कणांमध्ये झाले. त्यामुळे संतसोहळ्यानंतर कार्यक्रमस्थळी असणार्या व्यासपिठावर स्थुलातून विविध रंगांचे दैवी कण आढळले. यामध्ये सोनेरी आणि चंदेरी रंगांचे दैवी कण अधिक प्रमाणात होते. (प्रत्यक्षात कार्यक्रमस्थळी अनेक दैवी कण आढळले. – संकलक)
आ. हा सोहळा चालू असतांना हा कार्यक्रम पहाणारे सर्व साधक भावावस्थेत गेले होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमस्थळी निर्माण झालेले जनलोकाचे वायूमंडल सहजतेने अनुभवता येऊन चैतन्य ग्रहण करता आले.
इ. कु. प्रार्थना पाठक हिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे : ६८ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक (वय वर्षे १२, पू. (सौ.) मनीषा पाठक यांची कन्या) हिने तिच्या मातेने संतपद प्राप्त केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी भावाश्रूसहित कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा तिच्या हृदयात विराजमान असणार्या श्रीकृष्णाच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कु. प्रार्थनाने वाहिलेल्या भावाचे रूपांतर गुलाबाच्या पुष्पांमध्ये होऊन ती श्रीगुरूंच्या चरणी अर्पण झाली. तेव्हा कु. प्रार्थनाचा भाव पाहून तिच्या हृदयातील श्रीकृष्णाच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘तूही लहान वयात लवकरच समष्टी संत होशील’, असा कृपाशीर्वाद दिला.
९. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे : कार्यक्रमाला उपस्थित असणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांना संतसोहळ्याची पूर्वसूचना मिळाली होती आणि त्यांनी पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद प्राप्त केल्यावर त्यांना दोन्ही हात जोडून अन् वाकून भावपूर्ण नमस्कार केला’, असे दृश्य मला दिसले. (‘प्रत्यक्षात असेच घडले होते’ – सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या मातोश्री)
१०. कार्यक्रमाला सूक्ष्मातून उपस्थित असणार्या विविध घटकांमुळे कार्यक्रमाला उपस्थित असणार्या साधकांना विविध प्रकारच्या अनुभूती येणे
११. पू. (सौ.) मनीषा पाठक यांची संतपदापूर्वीची आणि संतपद प्राप्त केल्यानंतरची स्थिती
टीप १- जशी पू. (सौ.) मनीषा पाठक यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तसे त्यांच्या समष्टी साधनेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाणार आहे.
टीप २ – पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे अन्य संतांच्या तुलनेत त्यांचे देहप्रारब्ध अधिक असल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी आहेत. ६९ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत त्यांच्या व्यष्टी प्रारब्धामुळे त्यांना विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी होत्या. ७१ टक्के पातळी म्हणजे संतपद प्राप्त केल्यामुळे त्यांचे व्यष्टी स्तरावरील प्रारब्ध नष्ट झाले; परंतु समष्टी स्तरावरील प्रारब्ध, म्हणजे त्यांच्यावरील वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे त्यांना समष्टी स्तरावरील देहप्रारब्धरूपी विविध प्रकारचे शारीरिक त्रास आधीपेक्षा अल्प प्रमाणात भोगावे लागणार आहेत.
टीप ३ – पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद प्राप्त केल्यानंतर समष्टी प्रारब्धरूपी वाईट शक्तींचे त्रास जरी अधिक प्रमाणात भोगावे लागणार असले, तरी संतपद प्राप्त केल्यावर त्यांची वाईट शक्तींशी लढण्याची क्षमताही वाढणार आहे. यावरून ‘भगवंत साधक आणि संत यांना प्रारब्धभोग देण्याबरोबर ते भोगण्यासाठी आध्यात्मिक शक्तीही देत असतो’, हे तत्त्व शिकायला मिळाले.
१२. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी विविध योगमार्गांनी गेल्या २० जन्मांमध्ये साधना केल्यामुळे या जन्मात ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपद प्राप्त करणे
तात्पर्य : उत्तम शिष्यावर गुरुकृपा झाल्यावर शिष्याचे रूपांतर संतत्वात होणे – पू. सौ. मनीषा पाठक यांच्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असलेल्या अपार भाव, सेवेची तळमळ, त्यागी वृत्ती, प्रीती आणि आज्ञापालन करणे, या गुणांमुळे त्यांनी श्रीगुरूंचे मन जिंकून त्यांचे उत्तम शिष्यपद प्राप्त केले होते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्यावर कृपा करून त्यांना समष्टी संतपदी विराजमान केले. यावरून ‘उत्तम शिष्यावर गुरुकृपा झाल्यावर शिष्याचे रूपांतर संतत्वात कशाप्रकारे होते’, हे पू. सौ. मनीषा पाठक यांच्या साधनाप्रवासातील आध्यात्मिक सूत्रांतून शिकायला मिळाले.
कृतज्ञता : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला रामनाथी येथे राहून पुण्यामध्ये झालेल्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसोहळ्याचे आध्यात्मिक स्तरावर अवलोकन करून सूक्ष्म परीक्षणाद्वारे सूक्ष्म स्तरावरील घडामोडी आणि त्यांच्यामागील कार्यकारणभाव शिकता आला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांचाही अशाच प्रकारे उद्धार करावा’, अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करून त्यांच्या चरणी भावपुष्परूपी लेख समर्पित करते.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेल ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.३.२०२३)
|