२२ मार्च २०२३ या दिवशी असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने…
भारतीय पंचांग प्रणालीनुसार प्रत्येक वर्षाला विशिष्ट नाव असते आणि प्रत्येक नावाला एक अर्थ आहे. वर्षांची ६० नावे (संवत्सर) (टीप) आहेत. प्रत्येक नाव ६० वर्षांनंतर पुन्हा चालते. भारतीय वर्ष हे चैत्र मासात (सामान्यतः एप्रिल मासात) चालू होते. २०१९-२०२० या वर्षाला ‘विकारी’ असे नाव देण्यात आले, जे ‘आजार’ वर्ष म्हणून नावाप्रमाणे जगले ! वर्ष २०२०-२०२१ या वर्षाला ‘शार्वरी’ म्हणजे अंधार असे नाव देण्यात आले आणि त्याने जगाला एका अंधार्या टप्प्यात ढकलले. वर्ष २०२१-२२ ‘प्लव’ म्हणजे जे जे आपल्याला पलीकडे घेऊन जाते. वराह संहिता म्हणते, ‘‘हे जगाला असह्य अडचणींमधून पार करील आणि आपल्याला वैभवाच्या स्थितीत पोचवेल.’’ वर्ष २०२२-२३ या वर्षाचे नाव ‘शुभकृत’ आहे, ज्याचा अर्थ शुभ निर्माण करतो.
आम्ही आता आतुरतेने वाट पाहून उद्याचा दिवस चांगला जाण्याची अपेक्षा करू शकतो. येत्या गुढीपाडव्याला ‘शोभन’ संवत्सर चालू होणार आहे.
‘शोभन’ म्हणजे ‘शोभा देणारे’ म्हणजेच समृद्धी, कल्याण आणि गौरव प्रदान करणारे. ‘हे संवत्सर शुभसूचक असल्याने ते आपल्यासाठी आणि राष्ट्रासाठी कल्याणकारी राहील’, अशी आशा करूया.
टीप : संवत्सर नावे : प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापति, अङ्गिरा, श्रीमुख, भाव, युव, धातृ, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानु, सुभानु, तारण, पार्थिव, व्यय, सर्वजित्, सर्वधारी, विरोधी, विकृति, खर, नन्दन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलम्बी, विलम्बी, विकारी, शार्वरी, प्लव, शुभकृत्, शोभन, क्रोधी, विश्वावसु, पराभव, प्लवंग, कीलक, सौम्य, साधारण, विरोधकृत्, परिधावी, प्रमादी, आनन्द, राक्षस, अनल, पिङ्गल, कालयुक्त, सिद्धार्थी, रौद्र, दुर्मति, दुन्दुभी, रुधिरोद़्गारी, रक्ताक्षी, क्रोधन आणि क्षय अशी ६० नावे आहेत.
वर्ष २०४६ पर्यंत येणार्या संवत्सरांची नावे
पुढच्या काही वर्षांत येणार्या संवत्सरांची नावे भारतीय हिंदु पंचांग सांगू शकते. तथाकथित विज्ञानवादी असे कधी काही सांगू शकतात का ? यातूनच हिंदु धर्माची महानता दिसून येते ! – संपादक