शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि साधकांना घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक !

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत . . . 

पू. (सौ.) मनीषा महेश पाठक

१. तीव्र शारीरिक त्रास असूनही सतत सेवारत आणि आनंदी असणे अन् इतरांना आनंद देणे

मनीषाताई आय.टी. (माहिती आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातील नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ सेवारत झाल्या. तिला तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्या स्वतःला होणार्‍या त्रासाविषयी कधीही काही बोलत नाही. ताई अनेक वेळा शारीरिक त्रासांमुळे पलंगावर पडून भ्रमणभाषवरून एका वेळी अनेक सेवा करतात. त्यांना भ्रमणभाषवरून सत्संग घेतांना त्रास होत असूनही त्या उत्साहाने आणि आनंदाने बोलत असतात. ‘ताईंची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे जाणवते. त्या सतत हसतमुख असतात आणि स्वतःच्या सान्निध्यात असलेल्या प्रत्येकाला आनंदी करते.

२. साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी केलेल्या चांगल्या सेवेचे कौतुक करणे

कोरोना महामारीच्या काळात प्रत्यक्ष संपर्क शक्य नसतांना ताईंनी सर्व साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांना भ्रमणभाषद्वारे जोडून ठेवले. साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांनी पुढाकार घेऊन चांगली सेवा केल्यास ताई त्यांचे आनंदाने कौतुक करून त्यांना आणखी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देतात. त्या सर्वांची आपुलकीने विचारपूस करतात.

३. तत्त्वनिष्ठ

ताईंशी कोणत्याही प्रसंगावर मनमोकळेपणाने बोलता येते. त्या सर्वांना प्रेमाने आणि तत्त्वनिष्ठतेने साहाय्य करते. साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून देऊन साहाय्य करतात. समष्टीत काही चूक होणार असल्यास किंवा झाली असल्यास संबंधित सेवेचे दायित्व असणार्‍या साधकांना ती तत्त्वनिष्ठतेने त्या चुकीची जाणीव करून देते.’

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक