दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर सैनिक नीरा आर्या !’, या लेखाविषयी पू. गुरुनाथ दाभोलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ८.३.२०२३ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय महिलादिना’च्या निमित्ताने श्री. विनीत वर्तक यांचा ‘भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर सैनिक नीरा आर्या !’, या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचल्यावर देवद आश्रमातील पू. गुरुनाथ दाभोलकर (वय ८३ वर्षे) यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे देत आहोत.

पू. गुरुनाथ दाभोलकर

‘होय, वीरमाते, आम्ही तुम्हाला विसरलो. तुमचा पराक्रम, कार्य आणि कृती यांना जोडच नाही. आम्ही कृतघ्न आहोत. ‘आम्हाला आमचा खरा इतिहास कुणी शिकवलाच नाही’, हे आमचे दुर्दैव ! वीरमाते, तुम्ही देशासाठी आयुष्याची फुले केली आणि आम्ही तुम्हाला आयुष्याच्या शेवटी रस्त्यावर बसून फुले विकायला लावली. या सर्वांवर कळस म्हणजे आम्ही तुमच्या झोपडीवर बुलडोझर फिरवला. किती निर्दयीपणा ! किती हा अमानुषपणा !

भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात आतापर्यंत नीरा आर्या यांच्यासारखे अनेक ज्ञात-अज्ञात हुतात्मे होऊन गेले, ज्यांच्या कर्तृत्वाचा कुठे उल्लेखही होत नाही आणि स्वतंत्र भारताच्या कोट्यवधी जनतेला अशा थोर हुतात्म्यांची साधी ओळखही नाही. ‘अशा थोर विभूतींच्या इतिहासाविषयी संशोधन करून त्यांच्या इतिहासाची आताच्या जनतेला ओळख करून द्यावी’, अशी भारत सरकारला माझी कळकळीची विनंती !’

– (पू.) गुरुनाथ दाभोलकर (वय ८३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.३.२०२३)


नीरा आर्या

“भारताच्‍या पहिल्‍या महिला गुप्‍तहेर सैनिक नीरा आर्या !” हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/660303.html