राज्‍यपालांनी मुख्‍यमंत्र्यांना पाचारण करण्‍याचा घेतलेला निर्णय रहित करा ! – अधिवक्‍ता कपिल सिब्‍बल

महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण

ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल

देहली – राज्‍यपालांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदेे यांना सरकार स्‍थापन करण्‍यासाठी पाचारण करण्‍याचा घेतलेला निर्णय रहित करा, अशी मागणी ठाकरे गटाचे अधिवक्‍ता कपिल सिब्‍बल यांनी महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीच्‍या वेळी केली. त्‍यानंतर अभिषेक मनु सिंघवी, नंतर राज्‍यपाल आणि शिवसेनेचे अधिवक्‍ता यांनी युक्‍तीवाद केला. या वेळी सिब्‍बल यांनी शिवसेनेने आसाममधून तत्‍कालीन पक्षप्रतोद सुनील प्रभु यांना पदावरून हटवल्‍याविषयी पाठवलेल्‍या पत्रावरही आक्षेप घेतला.