हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त बेळगाव येथे आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

फेरीमध्‍ये सहभागी झालेले धर्मप्रेमी

बेळगाव (कर्नाटक), १६ मार्च (वार्ता.) – येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने रविवार १९ मार्च २०२३ या दिवशी मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्‍याजवळ, भारतनगर, शहापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा आयोजित करण्‍यात आली आहे. या सभेच्‍या प्रसारासाठी १६ मार्च या दिवशी शहरात वाहनफेरी काढण्‍यात आली.

ध्‍वजपूजन करतांना उद्योजक श्री. राजेंद्र जैन आणि अन्‍य धर्मप्रेमी

या फेरीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून झाला. प्रारंभी ध्‍वजाचे पूजन उद्योजक श्री. राजेंद्र जैन यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, तर पौरोहित्‍य श्री. श्रीपाद देशपांडे यांनी केले. फेरीच्‍या प्रारंभी बेळगाव दक्षिणचे भाजपचे आमदार अभय पाटील यांनी श्रीफळ वाढवले. या फेरीमध्‍ये ‘लोकसेवा फाउंडेशन’चे श्री. वीरेश हिरेमठ, ‘एंजल फाउंडेशन’च्‍या अध्‍यक्षा सौ. मीना बेनके आणि हिंदु जनजागृती समितीचे बेळगाव जिल्‍हा समन्‍वयक श्री. ऋषिकेश गुर्जर, कर्नाटक राज्‍य समन्‍वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

फेरीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे करण्‍यात आला. मालिनी परिसर, भारतनगर शहापूर येथे फेरीची सांगता करण्‍यात आली. या वेळी श्री. ऋषिकेश गुर्जर आणि सौ. मीना बेनके यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी १९ मार्चला होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहाण्‍याचे आवाहन केले.