सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

 

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. आश्रमातील वातावरण पवित्र आणि चैतन्‍यमय होणे अन् विधीच्‍या ठिकाणी चैतन्‍याचे प्रमाण अधिक असल्‍याचे जाणवणे

‘सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी सर्वत्र पवित्र आणि चैतन्‍यमय वातावरण होते. सर्व साधकांनी सात्त्विक पोषाख परिधान केला होता. सकाळी ७.४५ ते ८.३० या वेळेत मला ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या ठिकाणी बोलावले गेले. तेथे गेल्‍यावर मला चैतन्‍याचे प्रमाण अधिक जाणवले.

सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

२. विधीच्‍या ठिकाणी मोठी निर्वात पोकळी जाणवून ‘स्‍वतः त्‍या पोकळीत जात आहे’, असे जाणवणे

मला विधीच्‍या ठिकाणी पुष्‍कळ मोठी पोकळी जाणवत होती. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे समोर बसून विधी करत होते. तेव्‍हा ते माझ्‍यापासून पुष्‍कळ दूर असल्‍याचे मला जाणवले, तसेच ते पुष्‍कळ लहानही दिसत होते. त्‍यांच्‍या आजूबाजूला निर्वात पोकळी जाणवत होती. ‘मी त्‍या पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले.

३. निर्वात पोकळी म्‍हणजे ‘निर्गुण’ असल्‍याचे प्रत्‍यक्ष अनुभवणे

मला तेथे जाणवलेली निर्वात पोकळी म्‍हणजे ‘निर्गुण’ असल्‍याचे मी प्रत्‍यक्ष अनुभवले. मागील काही दिवसांपासून ‘प्राणशक्‍तीवहन उपचारपद्धती’नुसार नामजप शोधल्‍यावर मला ‘निर्गुण’ हा जप येत आहे. ‘ते निर्गुणत्‍व म्‍हणजे काय ?’, हे तेथे मला अनुभवता आले.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळेच मला निर्गुण तत्त्व अनुभवता आले’, याबद्दल त्‍यांच्‍या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.२.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक