१० वर्षांनी फाशीची शिक्षा हे लज्‍जास्‍पद !

१० वर्षे आरोपींना पोसल्‍यासाठी झालेला खर्च हा उत्तरदायींकडून वसूल करा !

‘राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या (‘एन्.आय.ए.’च्‍या) लक्ष्मणपुरी येथील विशेष न्‍यायालयाने वर्ष २०१७ मध्‍ये रेल्‍वेगाडीतील बाँबस्‍फोटांच्‍या प्रकरणी इस्‍लामिक स्‍टेटशी संबंधित महंमद फैसल, गौस महंमद खान, महंमद अझहर, आतिफ मुझफ्‍फर, महंमद दानिश, सय्‍यद मीर हुसेन आणि आसिफ इक्‍बाल उपाख्‍य रॉकी या ७ आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा अन् त्‍यांच्‍या महंमद आतिफ उपाख्‍य ‘आतिफ इराकी’ या साथीदाराला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली.’ (३.३.२०२३)