पुणे – जुन्नरच्या माजी नगरसेवकासह एकाच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत पुनाजी कवठे यांनी माजी नगरसेवक अविन विष्णु फुलपगार आणि अनिल वाल्मिकी (रा. जुन्नर) यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. यापैकी आरोपी फुलपगार यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
कवठे यांनी फुलपगार यांना एक जागा विकसित करण्यासाठी धनादेशाने रक्कम दिली; परंतु ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत ही जागा विकसित केली नसल्याचे लक्षात आल्याने पैशांची विचारणा केली. तेव्हा फुलपगार यांनी ‘बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे देतो’, असे सांगून वेळ घालवला. वारंवार पैसे मागूनसुद्धा ते पैसे देत नसल्याने, तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे कवठे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकालोकांना फसवणारे लोकप्रतिनिधी समाजहित काय साधणार ? |