परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात साधिकेला आलेल्‍या अनुभूती

अनुभूतींद्वारे साधकांना घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !   

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. त्‍यांच्‍या सत्‍संगात ‘देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांच्‍याकडे पाहून काय जाणवते ?’, याविषयी प्रयोग करून घेण्‍यात आले. तेव्‍हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. सारिका आय्या

१. ‘देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे यांतून पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

२. मला सत्‍संगात सुगंध येत होता.

३. मला वातावरणात गारवा जाणवत होता.

४. ‘सत्‍संग उच्‍च लोकात चालू आहे’, असे मला जाणवत होते.

५. मला मधूनच ॐकार आणि घंटानाद ऐकू येत होता.

६. परात्‍पर गुरु डॉक्‍टर तेथे प्रत्‍यक्षात असूनही त्‍यांची निर्गुण स्‍थिती जाणवत होती. ७. मला सूक्ष्मातून दिसले, ‘देवता परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना आशीर्वाद देत आहेत.’

– सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.