राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ०५.०३.२०२३

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक जणांचे सैनिकांवर सशस्त्र आक्रमण

बेरहामपूर (बंगाल) – भारत आणि बांगलादेश यांच्या बंगालमधील सीमेवर २६ फेब्रुवारी या दिवशी बांगलादेशी गुंड आणि नागरिक यांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण केले. बेरहामपूर सेक्टरमधील निर्मलचर पोस्ट ३५ बटालियनच्या भागात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. १०० हून अधिक असणार्‍या या बांगलादेशींकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी सैनिकांकडील बंदुका हिसकावून घेऊन बांगलादेशात पलायन केले. त्यांच्या आक्रमणात २ सैनिक घायाळ झाले. याविषयी सीमा सुरक्षा दलाने माहिती दिली आहे.

संपादकीय भूमिका : सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?


काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदु व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे जिहादी आतंकवाद्यांनी संजय शर्मा (वय ४० वर्षे) या काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. शर्मा हे बँक कर्मचारी होते. ते बाजारात जात असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्येचे दायित्व लष्कर-ए-तोयबाची शाखा असणार्‍या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. (एक जिहादी संघटना नष्ट न केल्याने त्याचाच परिणाम त्याच्या शाखा निर्माण होण्यात झाला आहे, हे सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका : ३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !