सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एका साधिकेच्या आईने साधिकेची पत्रिका एका ज्योतिषांना दाखवली आणि त्यांना ‘तिची काही ग्रहशांती वगैरे करायची का ?’, असे विचारले. तेव्हा त्या ज्योतिषांनी सांगितले, ‘‘या मुलीच्या जीवनात आलेले गुरु इतके तेजस्वी आणि सर्वशक्तीमान आहेत की, ‘त्यांच्यासमोर सगळे ग्रहतारे फिके आहेत. तिची ग्रहशांती वगैरे करायला नको. तिच्यावर सर्वशक्तीमान गुरूंची कृपा अखंड असल्यामुळे तिच्या आयुष्यात काही अडचणी येणार नाहीत. तिचे सगळे चांगलेच होईल.’’
आश्चर्य म्हणजे ते ज्योतिषी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ओळखत नाहीत आणि त्यांना सनातन संस्थेचे कार्यही ठाऊक नाही, तरीही त्यांनी साक्षात् महाविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची सर्वशक्तीमानता ओळखली.
अशा सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ गुरुदेवांच्या पावन चरणी भावपूर्ण कृतज्ञता !’
– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |