‘मणप्पुरम् फायनान्स’वर घातलेल्या दरोड्याप्रकरणी मुख्य धर्मांध आरोपीला जामीन नाकारतांना देहली उच्च न्यायालयाने केलेला निवाडा

१. मणप्पुरम् फायनान्स दरोड्याच्या प्रकरणात धर्मांध आरोपींना अटक

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

भारतात कोरोना महामारीची दुसरी लाट चालू होती. तेव्हा १४.४.२०१९ या दिवशी दिवसाढवळ्या देहलीतील ‘मणप्पुरम् फायनान्स लिमिटेड’च्या कार्यालयात धर्मांधांनी सशस्त्र प्रवेश केला आणि शस्त्रांचा धाक दाखवून ९ लाख ९८ सहस्र रुपये लुटले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान आणि शस्त्र कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा नोंदवला. यातील महत्त्वाचा आरोपी साजिद खान हा मुख्य सूत्रधार होता. त्याच्यासमवेत अजमेरूल अलम आणि महंमद जानू हे अन्य २ आरोपी होते. या दरोड्यासाठी आरोपींनी वापरलेली भारतीय बनावटीची बंदूक, पेपर कटर आणि बंदुकीच्या गोळ्या पोलिसांनी कह्यात घेतल्या. या सर्वांची ओळख ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या माध्यमातून पटली.

घटनेच्या दिवशी सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी पोलिसांना दरोडा पडल्याचा दूरभाष आला. त्या आधारे पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आरोपींना अटक करून फौजदारी गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपी साजिद खान याच्याकडून ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम आणि बंदूक कह्यात घेतली. दुसरा आरोपी महंमद जानू याच्याकडून अडीच लाख रुपये, एक पेपर कटर, भारतीय बनावटीची बंदूक आणि दोन जिवंत गोळ्या कह्यात घेतल्या. तिसरा आरोपी अजमेरूल अलम याच्याकडून २ लाख ४६ सहस्र रुपये आणि एक भारतीय बनावटीची बंदूक हस्तगत केली.

२. सत्र न्यायालयाकडून आरोपींना जामीन संमत

त्या वेळी कोरोना महामारीचा संसर्ग चालू होता. ‘त्याचा कारागृहात अधिक संसर्ग वाढू नये, तसेच आरोपींनी प्रथमच गुन्हा केला होता आणि त्यांच्याकडून कह्यात घेण्यासारखे काही शिल्लक नव्हते. त्यामुळे पोलिसांना त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही’, असे सत्र न्यायालयाचे मत झाले. या गोष्टी लक्षात घेऊन आरोपी अजमेरूल अलम याला सर्वप्रथम जामीन संमत करण्यात आला. अजमेरूल अलम याला जामीन मिळाल्यानंतर दुसरा आरोपी महंमद जानू यानेही जामिनासाठी अर्ज केला. अजमेरूल आलम याला जामीन मिळाला; म्हणून दुसरा आरोपी महंमद जानूलाही सुट्टीकालीन जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी जामीन संमत केला.

३. दरोड्यातील मुख्य आरोपी तथा सूत्रधाराचा जामीन अर्ज देहली उच्च न्यायालयाकडून असंमत

या प्रकरणातील दोन्ही जामीन ‘मेरीट’ (योग्यता) न बघता वेगळ्या परिस्थितीत दिले होते. या दोन्ही आदेशांचा संदर्भ देऊन मुख्य आरोपी अन् सूत्रधार साजिद खान याने जामिनासाठी अर्ज केला. त्याचा जामिनाचा अर्ज यापूर्वी एकदा असंमत झाला होता. त्यानंतर त्याने देहली उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. तो उच्च न्यायालयाने रहित केला. साजिद खान याचा जामीन नाकारतांना उच्च न्यायालयाने सांगितले, ‘‘आरोपी हा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याकडे लुटलेल्या रकमेतील अर्ध्याहून अधिक पैसे सापडले. आम्ही सहआरोपींना वेगवेगळ्या कारणांनी जामीन संमत केला आहे. तो निकष येथे लावता येणार नाही.’’ असे सांगून देहली उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या कालावधीतील न्यायमूर्तींनी ३०.५.२०२२ या दिवशी आरोपीचा जामीन अर्ज असंमत केला.

४. देहली उच्च न्यायालयाची सत्र न्यायालयावरील अप्रसन्नता

मुख्य आरोपी साजिद खान याचा जामीन अर्ज असंमत करतांना देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयालाही सुनावले, ‘‘अजमेरूल अलम याला जामीन दिला, तेच कारण महंमद जानू याला जामीन देतांना होते का ? हे जामीन अर्जाच्या आदेशावरून कळत नाही. दोन्ही आरोपींना दिलेल्या जामिनाची परिस्थिती भिन्न आणि विसंगत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी सत्र न्यायालयाने दक्षता बाळगावी. तसेच दोन आरोपींना जामीन देतांना साम्य स्पष्ट करावे.’’

सध्या भारतीय न्यायव्यवस्था आरोपीला अपवादात्मक परिस्थितीत कारावासात ठेवते. या प्रकरणात आरोपींनी दिवसाढवळ्या बंदुका, सुरा, पेपर कटर अशी शस्त्रे दाखवून १० लाख रुपये लुटले. त्यामुळे हे प्रकरण निश्चितच गंभीर आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून देहली उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारून जनतेशी न्याय केला, असेच म्हणावे लागेल. या प्रकरणात ‘अल्पसंख्यांकांच्या नावाखाली विविध सरकारी लाभ लाटणारे गुन्हेगारीत बहुसंख्य आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?’

श्रीकृष्णार्पणमस्तु !

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय. (२६.६.२०२२)