पुणे येथे ६ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

पुणे – येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात २१ फेब्रुवारी या दिवशी ६ गोवंशियांची कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. या वेळी २ गायी आणि ४ गोवंश यांची सुटका करून त्यांना गोशाळेत सोडण्यात आले. या प्रकरणी प्राणीमित्र शादाब मुलाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टेंपोचालक साहिल काझी, जफर शेख यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या कारवाईमध्ये गोरक्षक मंगेश चिमकर, ओमकार जाधव आणि निखिल दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यपूर्वकाळात ९० कोटी संख्येने असलेला गोवंश राजरोसपणे होत असलेल्या गोहत्येमुळे सध्या १ कोटीवर आला आहे. गोहत्‍या करणार्‍यांना कठोर शिक्षा न केल्‍याचा हा परिणाम येणार्‍या काळात सर्वांना भोगावा लागणार आहे. यासाठी गोहत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !