बलात्‍काराची तक्रार मागे घेण्‍यासाठी साहाय्‍यक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी !

पुणे – बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्याची तक्रार मागे घेण्‍यासाठी पीडित महिलेला जिवे मारण्‍याची धमकी देणार्‍या चंद्रकांत माने या साहाय्‍यक पोलीस निरीक्षकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. शिवाजीनगर न्‍यायालयाच्‍या आवारातील उपाहारगृहाजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी एका ५० वर्षांच्‍या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. पीडित महिलेने वर्ष २०२० मध्‍ये समर्थ पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली होती, तसेच तिने सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्‍यातही तक्रार दिली होती. त्‍या विरोधात माने यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे.

माने सोलापूर येथील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्‍तीस आहेत. चंद्रकांत माने हे पुणे येथे असतांना त्‍यांची तक्रारदार महिलेशी ओळख झाली होती. माने यांनी महिलेला जाळ्‍यात ओढून तिच्‍यावर बलात्‍कार केला होता. (असे वासनांध पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? असे पोलीस असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

असे पोलीस पोलीस खात्‍याला कलंकच आहेत. अशा पोलिसांना कठोर शिक्षा तात्‍काळ होणे आवश्‍यक !