अंनिसच्‍या कार्यक्रमांना त्‍यांचे धर्मद्रोही विचार असलेले फलक धरून विरोध करा !

म्हणे . . . 

‘‘अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण करणे, या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, प्रथा- परंपरा, देवता, संत यांच्‍यावर अत्‍यंत आक्षेपार्ह टीका करण्‍यात आल्‍याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. या माध्‍यमांतून देशाच्‍या भावी पिढीच्‍या मनातील देव, धर्म आदी श्रद्धास्‍थानांवर आघात करून त्‍यांना ‘नास्‍तिक बनवणे’, हा एकमेव अजेंडा असल्‍याचे लक्षात येते. त्‍यामुळे असे कार्यक्रम जिल्‍ह्यातील शाळांमधून आयोजित करण्‍यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अनुमती देऊ नये आणि दिली असल्‍यास ती तात्‍काळ रहित करावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सिंधुदुर्ग जिल्‍हा प्रशासन, शिक्षणाधिकारी आणि पोलीस यांना निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.’ (२१.२.२०२३)