दापोली येथे २१ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी हिंदुत्वनिष्ठांनी दिले मान्यवरांना निमंत्रण !

खेड, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – दापोली येथील आझाद मैदानात मंगळवार, २१ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मान्यवरांना सभेचे निमंत्रण देण्यात आले. हे निवेदन शिवसेना नेते श्री. रामदास कदम, आमदार श्री. योगेश कदम, मनसेचे श्री. वैभव खेडेकर आणि अन्य मान्यवरांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, श्री. विलास भुवड, डॉ. हेमंत चाळके, तसेच सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके आणि श्री. गोविंद भारद्वाज हे उपस्थित होते.

सभेचा विषय आवडला ! – रामदासभाई कदम, शिवसेना नेते

शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम यांना सभेचे निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे

निमंत्रण स्वीकारल्यानंतर शिवसेना नेते श्री. रामदासभाई कदम म्हणाले की, तुम्ही जो विषय या सभेकरता निवडला आहे, तो मला पुष्कळ आवडला आहे. मी सभेला येण्यासाठी अवश्य प्रयत्न करीन.

धार्मिक आघातांविषयी हिंदु बांधव संघटित होत आहेत ! – वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, मनसे

मनसेचे श्री. वैभव खेडेकर यांना सभेचे निमंत्रण देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

मंदिर व्यवस्थापनासाठी सरकार अन्य धर्मियांना नियुक्त करत असेल, तर त्यांच्याकडून मंदिराच्या उत्कर्षासाठी कसे काय प्रयत्न होणार ? उलट ते अनेक जाचक अटी हिंदु भाविकांवर घालतील. आता मात्र पद, पक्ष, जाती, संप्रदाय, संघटना हे भेद विसरून हिंदू संघटित होत आहेत, हे आशादायक चित्र आहे. मी आणि माझ्या पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेत सहभागी होऊ, तसेच हिंदु बांधवांनीही मोठ्या संख्येने या सभेत सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार योगेशदादा कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना शिवाचे चित्र भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

खेड, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज आमदार श्री. योगेश कदम यांची भेट घेण्यात आली. आमदार योगेश कदम यांना भेटून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी त्यांना पुष्पगुच्छ आणि शिवाचे चित्र भेट देण्यात आले, तसेच त्यांना दापोली येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रणही देण्यात आले. आमदार योगेश कदम यांनी ‘या सभेस मी आवर्जून उपस्थित राहीन’, असे सांगितले.

विशेष – आमदार योगेशदादा कदम यांना दिलेली शिव प्रतिमा त्यांनी त्वरित त्यांच्या घरातील देव्हार्‍यात ठेवण्यास दिली.