हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्‍फ बोर्ड कायद्या’च्‍या मुळावर घाव घाला ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

तत्‍कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्‍फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्‍यामुळे मुसलमानच नव्‍हे, तर हिंदु, ख्रिस्‍ती आणि अन्‍य पंथियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्‍फ बोर्डाची संपत्ती’ म्‍हणून घोषित करण्‍याचा अधिकार त्‍यांना मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) केला जात आहे. त्‍यामुळे समस्‍त हिंदूंनी संघटित होऊन या कायद्याच्‍या मुळावरच घाव घालून हा कायदा पालटण्‍यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे.