राज्‍यघटनेच्‍या पानावर श्रीरामाचे चित्र असणारा देश हिंदु राष्‍ट्र का होऊ शकत नाही ?

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांचा प्रश्‍न !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

छतरपूर (मध्‍यप्रदेश) – बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्र यांनी भारत हिंदु राष्‍ट्र बनणे आवश्‍यक आहे, असे विधान केले आहे. हिंदु राष्‍ट्र हे रामराज्‍य असेल. राज्‍यघटनेच्‍या पहिल्‍या पानावर श्रीरामाचे चित्र आहे. ज्‍या देशाच्‍या राज्‍यघटनेच्‍या पहिल्‍या पानावर श्रीरामाचे चित्र आहे, तो देश हिंदु राष्‍ट्र का होऊ शकत नाही ?, असा प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.

पंडित धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री पुढे म्‍हणाले की, भारत हिंदु राष्‍ट्र झाल्‍यास सामाजिक समरसता आणि सौहार्दता निर्माण होईल. असे झाल्‍यास कुणी श्रीरामचरितमानस जाळणार नाही.  भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यास भारत नक्‍कीच विश्‍वगुरु बनेल.