शहापूर (जिल्‍हा ठाणे) येथे गोरक्षकांनी धर्मांधाच्‍या कह्यातील १५ गोवंशियांचे प्राण वाचवले !

धर्मांध कह्यात !

गोवंशियांचे प्राण वाचवणारे हिंदुत्‍वनिष्‍ठ

ठाणे, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे जिल्‍ह्यातील शहापूर तालुक्‍यातील आसनगाव येथे धर्मांधाच्‍या कह्यात असलेल्‍या १५ गोवंशियांचे प्राण वाचवण्‍यात गोरक्षकांना यश आले आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला असून ट्रकचालकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (गोवंशियांचे प्राण वाचवणारे हिंदुत्‍वनिष्‍ठ हीच हिंदु धर्माची खरी शक्‍ती ! – संपादक)

ट्रकमध्‍ये आढळलेले गोवंशीय

१. १३ फेब्रुवारी या दिवशी नाशिक येथून मुंबईकडे गोवंश तस्‍करी करणारा ट्रक येणार असल्‍याची माहिती बजरंग दलाचे गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे शहापूर विभागाचे धारकरी यांना मिळाली होती. ट्रक आसनगाव परिसरात आल्‍यावर गोरक्षकांनी पाठलाग करून ट्रक अडवला. त्‍यात त्‍यांना १५ गोवंश आढळले.

२. ट्रकचालक साजिद अजिज बेग याला पोलिसांनी कह्यात घेतले असून गोवंशियांना भिवंडी येथील अनगाव येथे असलेल्‍या गोशाळेत ठेवण्‍यात आले आहे.

३. या कारवाईच्‍या वेळी महाराष्‍ट्र राज्‍य प्राणी संरक्षण अधिकारी रवींद्र राऊत, विहिंपचे भिवंडी जिल्‍हा सहमंत्री विजय डिंगोरे, बजरंग दलाचे भिवंडी जिल्‍हा सह संयोजक जयवंत ठाकरे, धर्मप्रसारप्रमुख सुनील पांढरे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे आकाश अधिकारी आणि गोरक्षक सुशांत खिसमतराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका 

जे गोरक्षकांना जमते, ते पोलीस का करू शकत नाहीत ?