भाजपचे हिंदुत्‍व बेगडी ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

आनंद दवे

पुणे – भाजपचे हिंदुत्‍व बेगडी असल्‍याने पुण्‍यातील अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. भाजपने आमच्‍या प्रश्‍नांना कधी प्रतिसाद दिला नाही, अशी टीका हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष आनंद दवे यांनी केले. ते कसबा पेठेत निवडणुकीला उभे राहिले असून त्‍यांचे चिन्‍ह बासरी हे आहे. दवे पुढे म्‍हणाले की, कसब्‍यातील ६० टक्‍के समाज माझ्‍या पाठीशी आहे. राजस्‍थानी, जैन समाजही मला पाठिंबा देत आहेत. भाजपला ही निवडणूक जड जाईल, असे वाटत आहे. त्‍यामुळेच भाजपला केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्‍यमंत्री यांना प्रचारासाठी आणावे लागत आहे. मनसेने मला पाठिंबा दिला, तर माझा विजय सोपा होऊ शकतो.