सिंगापूर येथे मंदिराच्या जीर्णाेद्धाराला २० सहस्र भाविक उपस्थित !

श्री मरिअम्मन मंदिर

सिंगापूर – येथे २०० वर्षे जुने असणार्‍या श्री मरिअम्मन मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या कार्यक्रमामध्ये २० सहस्र लोक सहभागी झाले होते. १२ फेब्रुवारी या दिवशी जीर्णाेद्धाराचा कार्यक्रम पार पडला. या दिवशी मुसळधार पाऊस पडत असतांनाही भाविकांचा उत्साह अल्प झाला नाही. या कार्यक्रमामध्ये देशाचे उपपंतप्रधान लॉरेंस वोंग हेही सहभागी झाले होते. या मंदिराचा जीर्णाेद्धार मागील १ वर्ष चालू होता.

२०० वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये गेलेल्या हिंदूंनी हे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी १२ विशेषज्ञ मूर्तीकार आणि ७ कारागिर भारतातून सिंगापूरला गेले होते. मंदिराच्या मूळ स्वरूपाला धक्का न देता सजावट करण्याचे दायित्व या विशेषज्ञांवर सोपवण्यात आले होते.