|
मुझफ्फरपूर (बिहार) – येथील महंमद जावेद याच्या घरातून पोलिसांनी ३ टाइम बाँब जप्त केले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींचे संबंध पाकिस्तानशी असल्याचे उघड झाले आहे. या आरोपींनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बाँब बनवले होते. जावेद, त्याचा बुलंदशहर येथील साथीदार महंमद शमी आणि अन्य एक यांनी बाँब बनवण्यासाठी झारखंड येथून बॅटरी, तर बंगालमधून तार खरेदी केली होते. तसेच बाँबसाठी लागणारे लहान घड्याळ मुझफ्फरनगर येथेच विकत घेतले होते. या आरोपींचा बाँब बनवण्यामागे काय उद्देश होता, हे अद्याप समजलेले नाही. या प्रकरणात जावेदचा भाऊ पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बिहार में जावेद के घर मिले 3 टाइम बम, YouTube देख कर बनाया था: फोन में पाकिस्तानी मोबाइल नंबर, कश्मीर से लौटा था#Muzaffarpur #Bihar #TimeBombhttps://t.co/DdYMcLfKcn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 13, 2023
या तिघांपैकी एकाकडे पाकिस्तानमधील भ्रमणभाष क्रमांक सापडला. तसेच जावेद काश्मीरला जाऊन आल्याचीही माहिती मिळाली. जावेदच्या भ्रमणभाषमध्ये भाजलेल्या तरुणाचे एक छायाचित्र सापडले. पोलिसांना शंका आहे की, बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात हा तरुण भाजला असू शकतो.
संपादकीय भूमिकाजर अशा प्रकरणात हिंदूंना अटक करण्यात आली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती ! |