प्रभु, मज सदा तव चरणांशी घ्यावे ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

तव सामोरी माझे
मीपण विसरावे ।
तव चरणांशी एकरूप मन व्हावे ।
भक्तासी या भक्तीचे वर द्यावे ।
प्रभु, मज सदा तव चरणांशी घ्यावे ।। १ ।।

कु. सायली देशपांडे

काया-वाचा-मन
तव चरणी लीन रहावे ।
पंचप्राणांचे आरतीपुष्प
सदा अर्पित असावे ।
श्वासानेही तुमचेच गुणगान गावे ।
प्रभु, मज सदा तव चरणांशी घ्यावे ।। २ ।।

गुरुदेव, आले शरण, चरणी मज घ्यावे ।
मोक्षाच्या मार्गावरती मज न्यावे ।
मनमंदिरी म्या नित्य तुम्हा ध्यावे ।
प्रभु, मज सदा तव चरणांशी घ्यावे ।। ३ ।।

चराचरी देवा, तुजला पहावे ।
मन माझे तुझ्यात हरपूनी जावे ।
सतत मी तुझेच स्मरण करावे ।
प्रभु, मज सदा तव चरणांशी घ्यावे ।। ४ ।।

– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक