श्री गजानन महाराज यांच्या कृपेने घराला आग लागण्यापासून वाचल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने…

श्री गजानन महाराज (शेगाव)

आज (१३.२.२०२३) या दिवशी शेगाव येथील थोर संत श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

श्रीमती भाग्यश्री आणेकर

‘एकदा मी डास मारण्याची ‘कॉईल’ (डास मारण्यासाठी लावलेली मोठी उदबत्ती) खिडकीत लावून झोपले होते. ती इमारत तशी पुष्कळ जुनी होती. मध्यरात्री श्री गजानन महाराज यांनी मला सूक्ष्मातून हाक मारून उठवले आणि सांगितले, ‘अगं बघ, खिडकीला आग लागली. ऊठ, ऊठ ! आधी ती आग विझव.’ तेव्हा मी उठून पाहिल्यावर अनुमाने हातभर खिडकीचे लाकूड जळून अग्नी पेटत होता. त्या वेळी गुरुदेव आणि श्री गजानन महाराज यांनी मला संकटातून वाचवले.’ – श्रीमती भाग्यश्री मोहन आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (११.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक