संस्‍काराने राष्‍ट्र तेजस्‍वी होणे

परात्पर गुरु पांडे महाराज

‘पिढ्यानपिढ्या जेव्‍हा चांगले संस्‍कार होत असतात, तेव्‍हा ती आत्‍मशक्‍ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्‍येच जर संस्‍कार बंद पडले, तर ते पुन्‍हा प्रस्‍थापित करण्‍यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्‍ये चालू होतात. त्‍याचे परिणाम समाज आणि राष्‍ट्र यांना भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्‍कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्‍ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्‍हा नवीन पिढीवर परत सुसंस्‍कार करणे आवश्‍यक आहे.’

– परात्‍पर गुरु पांडे महाराज

(श्री गणेश-अध्‍यात्‍म दर्शन, पृष्‍ठ ७८)