१.११.२०२१ या दिवशी सौ. निवेदिता जोशी यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित झाले. त्यानिमित्त नंदुरबार येथील साधिका कु. भावना कदम यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यातील पालट पुढे दिले आहेत.
१. प्रेमभाव
अ. ‘जोशीकाकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. त्या नंदुरबार येथे बालसंस्कारवर्ग घेतात. त्यांची मुलांशी लगेच जवळीक होते. त्यामुळे मुलांना बालसंस्कारवर्गाची ओढ निर्माण झाली आहे.
आ. सेवा करतांना किंवा वैयक्तिक अडचण आली, तर देव आधी त्यांचेच नाव सुचवतो आणि त्यांच्यामुळे अडचणही सुटते. त्यांना अडचण सांगायला कधीच संकोच वाटला नाही.
२. मनमोकळेपणा
मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असूनही त्या त्यांच्या घरातील आणि साधनेतील अडचणी अन् प्रसंग मला मनमोकळेपणाने सांगतात. त्यामुळे मला नेहमी त्या आपल्याशा वाटतात.
३. नियोजनबद्धता
काकू रामनाथी आश्रमात जातांना त्यांनी त्यांच्या सेवांचे नियोजन करून त्यांच्या सेवा इतरांकडे सोपवल्या आणि ‘काही अडचण असेल, तर मी साहाय्य करीन’, असे म्हणाल्या.
४. शिकण्याची वृत्ती
काकूंना अनेक नवीन सेवा शिकायला आवडतात आणि शिकण्यासाठी त्या प्रयत्नही करतात.
५. परिस्थिती स्वीकारणे
काकूंची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे; पण त्यांनी ती कधी दाखवली नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहून त्या साधना करतात.
६. तळमळ
अ. काकूंमध्ये सेवेची तळमळही पुष्कळ आहे. ‘नंदुरबार येथील साधकांच्या सेवेची घडी बसावी, सर्व साधकांनी झोकून देऊन साधना करून लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती करून घ्यावी’, असे त्यांना वाटते. ‘साधकांनी स्वभावदोषांवर मात करून प्रयत्न केले, तर लवकर सर्वांची प्रगती होईल’, असे त्यांना वाटते. त्या दृष्टीने त्या साधकांना साहाय्य करतात.
आ. ‘त्यांच्या मुलांनी सेवा आणि साधना करावी’, असा त्यांचा आग्रह असायचा; पण नंतर त्यांनी तो विचार देवावर सोडून दिला. आता त्यांच्या तळमळीमुळे त्यांची दोन्ही मुले श्री. ईशान जोशी आणि कु. सानिका जोशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करत आहेत. त्यांची दोन्ही मुले साधना करायला लागल्यावर त्यांच्या चेहर्यावरील कृतज्ञताभाव अजूनही मला आठवतो.
७. भाव
काकू भाववृद्धीसाठी प्रयोग, प्रार्थना आणि कृतज्ञता घेतांना अतिशय भावपूर्ण घेतात. भाववृद्धीसाठी प्रयोग घेतांना त्यांना अनुभूती येतात.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
काकूंना कधी सेवा सांगितल्यावर त्या सेवेला नाही म्हणत नाहीत. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) करून घेतील’, असा त्यांचा भाव असतो आणि ‘गुरुदेव त्यांच्या माध्यमातून सेवा करून घेत आहेत’, असे त्यांना अन् आम्हालाही जाणवते.
९. काकूंमध्ये जाणवलेले पालट
अ. काकू पूर्वी साधकांनी चूक सांगितली किंवा काही प्रसंग घडला, तर त्यांच्याकडून ते स्वीकारले जात नसे आणि त्या अस्थिर होत असत; पण आता त्या शांत राहून ‘ती माझी चूक आहे’, हे स्वीकारतात आणि सहजतेने सेवा करतात.
आ. आधी काकूंकडे पाहून ‘त्यांना पुष्कळ ताण आहे, त्यांचे काहीतरी गार्हाणे आहे’, असे वाटायचे. आता त्या परिस्थिती स्वीकारून आनंदी असतात.
‘गुरुमाऊली, सौ. निवेदिता जोशीकाकूंचे गुण आणि साधनेची तळमळ आम्हालाही आत्मसात करता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
– कु. भावना कदम, नंदुरबार (३.१०.२०२१)
निवेदिता पुष्प अर्पण झाले गुरुचरणी
दीपावलीचे दीप लागले सनातन सदनी ।
निवेदिता पुष्प अर्पण झाले गुरुचरणी ॥ १ ॥
तळमळ असे त्यांना गुरुसेवेची ।
खंत वाटे, कशी सेवा करू गुरुचरणांची ॥ २ ॥
ध्यास असे व्यष्टी अन् समष्टी साधनेचा ।
सखी झाली मुक्त चुकवुनी फेरा जन्म-मृत्यूचा ॥ ३ ॥
अशी कृष्ण सखी दिली आम्हासी ।
त्यांच्यासम गुण येवोत आमच्या अंगी ॥ ४ ॥
दुग्धशर्करा योग झाला दिवाळीच्या दिनी ।
कृतज्ञता व्यक्त करते गुरुमाऊली तव चरणी ॥ ५ ॥
– कु. भावना कदम, नंदुरबार (१.१०.२०२१)