वाराणसीच्या एका गावातील हनुमान मंदिरात अज्ञातांकडून मूर्तींची तोडफोड !

हनुमान मंदिरात अज्ञातांकडून मूर्तींची तोडफोड

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील चौबेपूरच्या डुबकिया गावामधील खपडिया बाबा आश्रमातील दक्षिणामुखी हनुमान मंदिरामध्ये असलेल्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तर त्रिशूल बाहेर फेकण्यात आले. तसेच येथील शिवलिंग गायब करण्यात आले आहे. नंदीची मूर्ती बाहेर फेकण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या चित्रणाद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच येथे नवीन मूर्तींची स्थापना करण्याचेही आश्वासन दिले आहे. तोडफोडीची ही घटना ५ फेब्रुवारीच्या रात्री घडली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांत नव्हे, तर हिंदुबहुल भारतात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ठरतात, हे हिंदूंना लज्जास्पद !