चाकूद्वारे आक्रमण करण्याची धमकी देणारा अब्दुल जफर याला अटक !

कलबुर्गी (कर्नाटक) – बाजारात हातात चाकू घेऊन लोकांना त्याद्वारे आक्रमण करण्याची धमकी देणारा अब्दुल जफर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले. पोलीस त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्यावर त्याने पोलिसांवरच आक्रमण केले. यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.