साधकांनो, आपल्‍या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्‍य असल्‍याने संपर्क करतांना न्‍यूनगंड बाळगू नका !

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

‘अनेक वेळा सनातन संस्‍थेचे साधक समाजातील आधुनिक वैद्य, अधिवक्‍ता यांसारख्‍या प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तींना संपर्क करण्‍यासाठी जातात. त्‍यांच्‍याकडे असलेले ज्ञान पाहून अनेक साधकांना त्‍यांच्‍याएवढी बौद्धिक क्षमता स्‍वतःकडे नाही किंवा काही शिक्षण अल्‍प असलेल्‍या साधकांना ‘त्‍यांना साधना कशी समजावून सांगायची आणि संस्‍थेचे कार्य कसे पटवून द्यायचे ?’, असा न्‍यूनगंड वाटतो. सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर संकलित केलेली ग्रंथसंपदा अमूल्‍य असून पृथ्‍वीवर कुठेच उपलब्‍ध नसलेले ज्ञान सनातनच्‍या ग्रंथांमध्‍ये आहे. त्‍याच समवेत गेल्‍या काही वर्षांत सनातन संस्‍थेशी समाजातील सर्व स्‍तरांतील व्‍यक्‍ती सनातन संस्‍थेचे अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य लक्षात घेऊन आणि त्‍यानुसार कृती केल्‍याने त्‍यांना आलेल्‍या अनुभूतींमुळे सनातनकडे आकृष्‍ट होत आहेत. त्‍यामुळे साधकांनो, आपल्‍या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्‍य असल्‍याने संपर्क करतांना न्‍यूनगंड बाळगू नका !’

– सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था.