जातीच्‍या दाखल्‍यासाठी लाच घेणार्‍यावर पिंपरी (पुणे) येथे कारवाई !

पिंपरी (जिल्‍हा पुणे) – जातीच्‍या दाखल्‍यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयामधील नागरी सुविधा केंद्रातील ‘ऑपरेटर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या (एसीबीच्‍या) पथकाने पकडले आहे. ही कारवाई २ फेब्रुवारी या दिवशी करण्‍यात आली. शैलेश बासुटकर असे लाच घेणार्‍या ऑपरेटरचे नाव असून त्‍याला कह्यात घेतल्‍यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्‍हा नोंद करण्‍याचे काम चालू होते. या प्रकरणी २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती.

संपादकीय भूमिका 

प्रत्‍येकच सरकारी कामासाठीही लाच मागितली जाते, असे वाटते. ही स्‍थिती गंभीर आणि संतापजनक आहे. हे थांबण्‍यासाठी लाच घेणार्‍यांची शिक्षा त्‍वरित आणि अधिक करायला हवी !