८ वर्षीय मुलीला अश्‍लील चित्रफीत दाखवणार्‍या ६० वर्षीय व्‍यक्‍तीला अटक !

समाजात वाढत चाललेली वाढती वासनांधता म्‍हणजे उरलीसुरली नैतिकताही नष्‍टच करत आहे !

मुंबई – येथील ८ वर्षीय मुलीला अश्‍लील चित्रफीत दाखवणार्‍या ६० वर्षांच्‍या गृहस्‍थाला दादर पोलिसांनी अटक केली. आरोपीने आणखीही काही मुलींचा विनयभंग केला आहे; पण आतापर्यंत केवळ एकाच मुलीच्‍या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.